Download App

सूरज चव्हाणचा ‘मनसुख हिरेन’ होणार; नितेश राणेंनी व्यक्त केली भीती

  • Written By: Last Updated:

Nitesh Rane On Aaditya Thackeray :  भाजप आमदार नितेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच सूरज चव्हाणचा मनसुख हिरेन किंवा सुशांत सिंग होणार नाही ना याची दखल संबंधित विभागाने घ्यावी, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सूरज चव्हाण यांच्या जिवाला धोका असल्याचे बोलले  जात आहे.

आदित्य ठाकरे स्वतः सूरज चव्हाणला भेटायला गेले.दिशा सालियानच्या हत्येनंतर काही लोक सुशांत सिंगला भेटायला गेले होते.भेट झाल्यानंतर काहीच दिवसात सुशांत सिंगची हत्या झाली.असच काही सूरज चव्हाण बाबत घडणार नाही ना? अशी शंका नितेश राणे यांनी उपस्थित केली. त्यामुळे सूरज चव्हाणचा मनसुख हिरेन किंवा सुशांत सिंग होणार नाही ना याची दखल संबंधित विभागाने घ्यावी, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे आणि कुटुंबीयांचा इतिहास आहे की, जे  त्यांना आडवे आले त्यांना ठाकरेंनी संपविले आहे, असेही राणे म्हणाले.

‘त्यावेळी ते प्राथमिक शाळेत असतील’; पवारांनी उडवली फडणवीसांच्या वक्तव्याची खिल्ली


तसेच  उद्धव ठाकरेंना पूर्वी किती मानसन्मान मिळायचा आणि पाटण्यात किती मिळाला.एका कोपऱ्यात मेहबूबा मुफ्तीच्या बाजूला उद्धव ठाकरेला टाकण्यात आले. मातोश्री पासून हाकेच्या अंतरावर असलेली शाखा तोडली जाते आणि अनिल परब आणि लोक शेंबड्या पोरांसारखे मोर्चा काढता आहे, असे म्हणत त्यांनी ठाकरेंना डिवचले.

600 गाड्यांच्या ताफ्यासह बीआरएसचं वादळ सोलापूरच्या दिशेने; महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठे धक्के बसणार?

यावेळी त्यांनी खासदार संजय राऊतांवर देखील निशाणा साधला. आजच्या सामनामध्ये राऊतांनी मोदींना हटविण्यासाठी देशातील विरोधी पक्ष वॅग्नोर ग्रुप असल्याचे म्हटले. यावर राणेंनी राऊतांना सुनावले. संजय राऊतांना वॅग्नोर ग्रुपचा इतिहास माहीत तरी आहे काय.थोडी माहिती घेतली असती तर विरोधकांच्या पाटणा बैठकीला वॅग्नोर ग्रुप म्हणायची हिंमत झाली नसती. संजय राऊत घरफोड्या आहे.wagonr ग्रुपचा लीडर नाझी विचारसरणीचा होता.संजय राऊतला पाटण्यात भेटलेले पण नाझी विचारसरणीचे आहेत असे म्हणायचे आहे का? असा सवाल राणेंनी उपस्थित केला.

Tags

follow us