BJP Meeting for Vidhansabha Election in Mumbai : लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यातील विधानसभा निवडणुकीची (Vidhansabha Election) तयारी सर्वच राजकीय पक्षांकडून सुरू झाली आहे. यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची देखील लगबग सुरू झाली आहे. त्यासाठी 18 आणि 19 जुलैला भाजपची मुंबईत मोठी बैठक (BJP Meeting) आयोजित करण्यात आली आहे.
Vishalgarth Encroachment वरून मुश्रीफ, सतेज पाटील, जलीलांवर संभाजीराजे आक्रमक
या बैठकीला महाराष्ट्राचे भाजपचे निवडणूक प्रभारी व सह प्रभारी दोघेही उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह इतर नेते देखील उपस्थित असणार आहेत. या बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठीचा रोड मॅप ठरवला जाणार आहे. त्याचबरोबर जागा वाटप आणि मित्र पक्षांवर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.
पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांनी ही वेळ का आणू दिली? संभाजीराजेंचा सवाल
शिंदे, फडणवीस अन् दादांसाठी धोक्याची घंटा…
दुसरीकडे महायुतीने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार कंबर कसली आहे. मतदारांची मानसिकता बदलण्यासाठी अर्थसंकल्पाच्या निमित्ताने अनेक लोकप्रिय योजनांची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे. यात महिलांसाठीची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरेल अशी सरकारला अपेक्षा आहे. याशिवाय सरकारने सोयाबिन आणि कापूस अनुदानाचाही निर्णय या आधिवेशनात मार्गी लावला. तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या मुलींची फी माफी करण्यात आली आहे. या सगळ्या योजनांचा सत्ताधारी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभेत फायदा मिळेल अशी अपेक्षा सत्ताधारी नेत्यांना आहे.