Download App

मोठी बातमी! ‘गोळीबार’ प्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड यांना अटक; रिव्हॉल्वर जप्त

Kalyan News : उल्हासनगर येथील हिल पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री भाजप नेत्याने शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार केला. आता या घटनेचे तीव्र पडसाद राज्यात उमटू लागले आहेत. या प्रकरणी आता मोठी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक केली आहे. जमिनीचा वाद आणि आपसांतील वैमनस्य यातून हा थरारक प्रकार घडल्या आता समोर आले आहे. दरम्यान, या प्रकरणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन महेश गायकवाड यांची भेट घेतली.

शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर गोळीबार झाला आहे. काही वृत्तांनुसार भाजप (BJP) आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी स्वतः तर काही वृत्तांनुसार त्यांच्या अंगरक्षकाने उल्हासनगर येथील हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्येच हा गोळीबार केला आहे. या घटनेत महेश गायकवाड यांना दोन तर त्यांच्या मित्राला दोन गोळ्या लागल्या असून दोघेही जखमी झाले आहेत. दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, आमदार गायकवाड यांच्या मुलामध्ये आणि महेश गायकवाड या दोघांमध्ये 50 गुंठे जमिनीचा वाद सुरु होता. या वादाबाबत आज उल्हासनगर येथील हिललाईन पोलीस ठाण्यात बैठक सुरु होती. यावेळी आमदार गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यातील हा वाद मिटण्याऐवजी जोरदार खडाजंगी झाली. काही वेळातच हा वाद इतका वाढला की महेश गायकवाड यांच्यावर पोलीस निरीक्षकांच्या समोरच गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाला वेग देत आमदार गायकवाड यांच्यासह तिघांना अटक केली आहे.

कल्याण : CM शिंदेंच्या माजी नगरसेवकावर गोळीबार; भाजप आमदार गणपत गायकवाडांचे पोलिसांसमोरच कृत्य

माझा मनस्ताप झाला म्हणून फायरिंग केली : गणपत गायकवाड 

या प्रकरणात आमदार गणपत गायकवाड यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. पोलीस स्टेशनमध्ये माझ्या मुलाला धक्काबुक्की केली. माझ्या जागेचा जबरदस्तीने ताबा घेतला. एकनाथ शिंदे राज्यात गुन्हेगारांचं राज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. शिंदे मुख्यमंत्री असतील तर महाराष्ट्रात गुन्हेगारच पैदा होतील. आमच्यासारख्या चांगल्या माणसांना एकनाथ शिंदेंनी गुन्हेगार केले. माझा मनस्ताप झाला म्हणून मी फायरिंग केली अशी प्रतिक्रिया गायकवाड यांनी दिली.

Tags

follow us