Download App

मुंबईत फ्लॅट घेण्यासाठी पैसेच नाहीत! मराठवाड्यातील भाजप आमदाराने परत केले म्हाडाचे घर

मुंबई : बँकेने मला फ्लॅटच्या किंमतीच्या 90 टक्क्यांपर्यंत कर्ज देण्यास असमर्थता दर्शविली, त्यामुळे माझ्याकडे डाऊन पेमेंटसाठी पैसेच नाही, असं म्हणतं भाजप आमदार नारायण कुचे (Narayan Kuche) यांनी लॉटरीत मिळालेली म्हाडाची सदनिका परत केली आहे. त्यामुळे हा फ्लॅट आता केंद्रीय मंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) यांना मिळणार आहे. मात्र ते हा फ्लॅट खरेदी करणार की नाही, याबाबत अद्याप त्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. (BJP MLA Narayan Kuche has surrendered MHADA’s most expensive flat due to financial reasons)

दक्षिण मुंबईतील ताडदेव येथील म्हाडाच्या उच्चभ्रू इमारतीमध्ये  4 हजार 82 प्लॅट आहेत. 24 लाखांपासून ते 7 कोटी 57 लाख रुपये घरांची किंमत आहे. मागील काही दिवसांपूर्वी अल्प, मध्य व उच्च उत्पन्न गटांसाठी घराची सोडत झाली. यात 120 घरे उच्च उत्पन्न गटासाठी राखीव होती. तर 130 घरे मध्य उत्पन्न गटांसाठी राखीव होती. शिवाय 2 हजार 700 घरे आर्थिक दुर्बल घटकांसाठी होती. ज्यामध्ये प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत 1,947 सदनिका समाविष्ट होत्या. तर एक हजार घरे अल्प उत्पन्न गटासाठी होती.

Hasan Mushrif : उद्धव ठाकरेंना आमदारांनी का सोडलं? मुश्रीफांनी पहिल्यांदाच थेट उत्तर दिलं

उच्च उत्पन्न गटातील 120 पैकी एक घर आजी-माजी खासदार, आमदार यांच्यासाठी राखीव होते. जवळपास 1,531 चौरस फूट चटई क्षेत्रफळ असलेल्या या घराची किंमत 7 कोटी 57 लाख 94 हजार 268  रुपये होती. या घरासाठी जालना जिल्ह्यातील बदनापूर मतदारसंघाचे भाजप आमदार नारायण कुचे आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी अर्ज केला होता. मात्र सोडतीमध्ये हे घर कुचे यांना मिळाले.

‘बच्चू कडू कोण बाबा?’ गल्लीबोळातल्या लोकांवर..; कडूंच्या ‘त्या’ वक्तव्यावर पवारांचा खोचक टोला

पण आता कुचे यांनी हे घर घेण्यास असमर्थता दर्शविल्याने हे घर कराड यांना मिळणार आहे. कराड यांनीही हे घर घेण्यास असमर्थता दर्शविल्यास ते अनारक्षित होऊन उच्च उत्पन्न गटातील दुसऱ्या व्यक्तीला मिळणार आहे. याबाबत बोलताना कुचे म्हणाले, “मला वाटले की मला फ्लॅटच्या किमतीच्या 90 टक्के रक्कम गृहकर्ज म्हणून मिळेल, पण बँक फक्त 5 कोटींचे कर्ज मंजूर करत आहे. 7 कोटींच्या कर्जासाठी बँकेने असमर्थता दर्शविली आहे. उर्वरित रक्कम किंवा डाऊन पेमेंटसाठी माझ्याकडे पैसे नाहीत. म्हणून मी फ्लॅट सरेंडर करत आहे.

Tags

follow us