‘बच्चू कडू कोण बाबा?’ गल्लीबोळातल्या लोकांवर..; कडूंच्या ‘त्या’ वक्तव्यावर पवारांचा खोचक टोला
Sharad Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल केलेल्या वक्तव्यावरून राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. काल दिवसभर याच वक्तव्याची चर्चा होती. नेत्यांच्या प्रतिक्रिया येत होत्या. प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनीही शरद पवार आणि अजित पवार यांना जोरदार टोला लगावला होता. त्यांच्या या वक्तव्यावर आज शरद पवार यांनी कडूंना खोचक शब्दांत सुनावला.
पवार यांनी आज सकाळी कोल्हापूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना बच्चू कडू यांच्या वक्तव्याबाबत विचारले. त्यावर पवार यांनी कडूंना अप्रत्यक्षपणे चांगलेच सुनावले. बच्चू कडू कोण बाबा? मी एका राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष आहे. चार वेळा राज्याचा मुख्यमंत्री होतो. केंद्रात महत्वाच जबाबदारी होती. त्यामुळे उद्या तर आणखीन कुणा गल्लीबोळातल्या लोकांबाबतच्या प्रतिक्रिया मला मागाल, अशा खोचक शब्दांत त्यांनी कडू्ंना सुनावले.
Sharad Pawar : पक्ष म्हणजे आमदार नाहीत, राष्ट्रवादीत फूट नाही; शरद पवारांनी पुन्हा ठणकावलं!
यानंतर पत्रकारांनी त्यांना बच्चू कडू चार वेळा आमदार असल्याची आठवण करून देताच शरद पवारांनी ते चार वेळा आमदार आहेत. मी चार वेळा मुख्यमंत्री होतो, असे पवार म्हणाले.
काय म्हणाले होते बच्चू कडू ?
पवार काका पुतण्या हे लोकांना वेड्यात काढत आहेत. जास्त लक्ष दिलं तर डोकं फुटायची वेळ येईल. पवार साहेब जे बोलतात ते करत नाही. जे बोलत नाहीत ते करतात असेही बच्चू कडू म्हणाले. शिवसेना फुटल्यानंतर जे घडलं तसं इथं दिसत नसल्याचे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दोन तीन रस्ते पाहून ठेवले असतील. तसेच सगळ्याचे संगम करून स्वतःचाच एक सागर निर्माण करण्याचा त्यांचा विचार असेल असेही बच्चू कडू यावेळी म्हणाले.
‘पवारांचं विधान नुसता गेम नाही तर ऑलिम्पिकचं; अधिक विचार केला तर डोकं फुटेल’
सगळे करण्यात येणारे सर्व्हे बोगस असतात. 50 टक्के लोकं खरं काही सांगत नाही. त्यामुळे राजकारण हे राजकारणाप्रमाणे करावे लागते. तसेच संख्याबळाचा विचार करून रहावं लागतं शिवाय नको असलेल्या शक्ती देखील कधी कधी सोबत घ्याव्या लागतात, असेही कडू म्हणाले होते.