‘पवारांचं विधान नुसता गेम नाही तर ऑलिम्पिकचं; अधिक विचार केला तर डोकं फुटेल’

  • Written By: Published:
‘पवारांचं विधान नुसता गेम नाही तर ऑलिम्पिकचं; अधिक विचार केला तर डोकं फुटेल’

कोल्हापूर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवार (Ajit Pawar) आमचेच नेते असल्याचे विधान करत पुन्हा एकदा मोठी गुगली टाकली आहे. पवारांच्या या विधानानं एकीकडे खळबळ माजलेली असून, आजचं विधान म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची मोठा गेम नसून ही ऑलिम्पिकचं असू शकेल अशी खोचक टिप्पणी प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी व्यक्त केली आहे. ते कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. (Bacchu Kadu On Sharad Pawar)

‘त्रिशूळ’ सरकारला जनता देणार ‘दे धक्का’; लोकसभेसाठी जनता ‘मविआ’च्या फेव्हरमध्ये

पवार काका पुतण्या हे लोकांना वेड्यात काढत आहेत. जास्त लक्ष दिलं तर डोकं फुटायची वेळ येईल. पवार साहेब जे बोलतात ते करत नाही. जे बोलत नाहीत ते करतात असेही बच्चू कडू म्हणाले. शिवसेना फुटल्यानंतर जे घडलं तसं इथं दिसत नसल्याचे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दोन तीन रस्ते पाहून ठेवले असतील. तसेच सगळ्याचे संगम करून स्वतःचाच एक सागर निर्माण करण्याचा त्यांचा विचार असेल असेही बच्चू कडू यावेळी म्हणाले.

धनंजय मुंडेंची सुप्त इच्छ पूर्ण; पवारांचं विधान म्हणजे देवाने दिलेला आशीर्वाद

यावेळी बच्चू कडू यांनी लोकसभा निवडणुकांबाबत करण्यात आलेल्या सर्व्हेवरही भाष्य केले. ते म्हणाले की, सगळे करण्यात येणारे सर्व्हे बोगस असतात. 50 टक्के लोकं खरं काही सांगत नाही. त्यामुळे राजकारण हे राजकारणाप्रमाणे करावे लागते. तसेच संख्याबळाचा विचार करून रहावं लागतं शिवाय नको असलेल्या शक्ती देखील कधी कधी सोबत घ्याव्या लागतात.

वडेट्टीवारांना पवारांवर पूर्ण विश्वास; विधानाचा अर्थ अजितदादा अन् फडणवीसांना विचारा

राजकारणात भावा भावात विश्वास ठेवता येत नाही असे म्हणत शरद पवार यांचेच बघा ना? अजित पवार सत्तेत आहेत शरद पवार विरोधात आहेत. माझी निष्ठा सामान्य माणसावर आणि माझ्या शेतकरी बापावर आहे. माझ्या डोक्यात कोणता नेता नाही, जात, पात, धर्म, पंत नाही. तर, माझ्या डोक्यात जनता आहे, म्हणून मी चार वेळा आमदार निवडून आलो नाही. बाप मेल्याचं दुःख नाही, पण नेत्या मेल्याचं दुःख कार्यकर्त्यांना असतं. बापापेक्षा नेता महत्वाचा वाटत असलेल्या कार्यकर्त्यांमुळे लोकशाहीची आणि देशाची वाट लागली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube