Nitesh Rane : राज्यात सध्या ड्रग्ज प्रकरणारून विरोधकांनी राज्य सरकारला कोंडीत पकडले आहे. ड्रग्ज माफिया ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून जाण्या पाठीमागे शिंदे गटातील एक मंत्री आणि नाशिकमधील एक स्थानिक आमदाराचा हात असल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणात मंत्री दादा भुसे यांचे नाव विरोधी नेत्यांकडून घेतले जात असून या प्रकरणाची चौकशीची मागणी केली जात आहे. आज सकाळी पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनीही मंत्री भुसे यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर आता भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीच्या काळातील जुने प्रकरण उकरून काढले आहे. या प्रकरणात चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
ABP C Voter Survey : लोकसभेपूर्वी भाजपला जोर का झटका; पाच राज्यांच्या सर्व्हेत ‘कमळ’ कोमजणार
नितेश राणे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, दादा भुसेंवर आरोप करत आहात मग, महाविकास आघाडी सरकारच्या काळात एक युवा मंत्री मुंबईतील बांद्रा येथील रिजवी कॉलेजच्या मागे एका बंगल्यात बसून कोण कोणत्या ड्रग्ज माफियांना भेटायचा याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी मी करणार आणि पत्र सुद्धा लिहिणार आहे.
आता उडता महाराष्ट्रचा मुद्दा निघालाच आहे तर मी सांगू इच्छितो की या उडता महाराष्ट्रचा प्रमुख हा मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर राहतो. मविआ सरकारच्या काळात मुंबईचा पालकमंत्री किती ड्रग्ज माफियांच्या संपर्कात होता? सुशांत सिंह राजपूत दिशा सालियन प्रकरणात कोणाचं नाव होतं? जुन्या महापौर बंगल्यावर किती ड्रग्ज माफिया यायचे? तुम्हाला चौकशी करायची असेल तर करू दे चौकशी होऊ दे असे आव्हान नितेश राणे यांनी दिले.
Sanjay Raut : गद्दारी-बेईमानी हा ‘अंगार’ नव्हे ‘भंगार’; राऊतांचा CM शिंदेंवर हल्लाबोल
खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत भाजपा मुख्यालयात पैसे छापण्याची मशीन आहे असा आरोप केला होता. यावरही राणे यांनी राऊतांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले. पैसे छापण्याचा कारखाना भाजपाच्या मुख्यालयात नाही तर पैसे छापण्याचा कारखाना हा तुझ्या मालकाच्या कर्जतच्या फार्म हाऊसवर आहे. हिंमत असेल तर दोन पत्रकारांना तिथे घेऊन जा. गेट उघडून दाखव आतमध्ये किती पैसे मोजण्याचे मशीन ठेवले आहेत, असे आव्हान नितेश राणे यांनी दिले.