ABP C Voter Survey : लोकसभेपूर्वी भाजपला जोर का झटका; पाच राज्यांच्या सर्व्हेत ‘कमळ’ कोमेजलं
नवी दिल्ली : देशातील तेलंगणा, राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या (Five State Assembly Election) तारखांची घोषणा झाली असून, या निवडणुकांकडे 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभेपूर्वीची सेमिफायनल म्हणून बघितले जात आहे. तारखांची घोषणा होताच आता कोणत्या राज्यात कुणाला सत्ता मिळणार याचा अंदाज बांधणारा सी-व्होटरचा सर्व्हे जाहीर करण्यात आला आहे. यात भाजपला केवळ राजस्थानमध्ये विजय मिळवता येईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ( Five State Assembly Election ABP C Voter Survey )
पठाणकोट हल्ल्यातील म्होरक्याचा पाकिस्तानात खात्मा; शाहिद लतीफची गोळ्या झाडून हत्या
पाच राज्यांपैकी केवळ एकाच राज्यात भाजपचा (BJP) विजय दिसत असल्याने 2024 च्या लोकसभेपूर्वी भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. तर, तेलंगणात विद्यामान सीएम केसीआर (KCR) यांना धक्का बसू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.तेलंगणामध्ये विधानसभेच्या एकूण 119 जागा असून यात काँग्रेसला 48 ते 60, भाजपला 5 ते 11, बीआरएस पक्षाला 43 ते 55 तर, अन्य पक्षांना 5 ते 11 जागांवर विजय मिळेल असे सांगण्यात आले आहे.
मिझोराममध्ये MNF चा वाजणार डंका
मिझोराममध्ये झोरमथांगाचा पक्षाचा डंका वाजू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला असून, काँग्रेस आणि MNF या दोघांमध्ये काटे की टक्कर होण्याचा अंदाज आहे. सर्व्हेनुसार मिझोराममधील 40 जागांपैकी सत्ताधारी पक्ष मिझो नॅशनल फ्रंटला (NMF) 13 ते 17 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे काँग्रेसला 10-14 जागा मिळण्याची शक्यता आहे. राज्याच्या झोरम पीपल्स मूव्हमेंटला (ZPM) 9 ते13 जागा तर, अन्य पक्षांना 1 ते 3 जागांवर विजय मिळवता येईल असे सांगण्यात आले आहे.
अजितदादांचा राजीनामा! जिल्हा बँकेच्या माध्यमातून पार्थ पवारांची राजकारणात होणार ग्रँड एन्ट्री?
छत्तीसगडमध्ये काँग्रेस ठरणार मोठा पक्ष?
सी व्होटरच्या अंदाजानुसार छत्तीसगडमधील एकूण 90 जागांपैकी काँग्रेसला (Congress) सर्वाधिक 45 ते 51 जागांवर विजय मिळवता येईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर, भाजपला 39 ते 45 जागा मिळण्याची शक्यता असून अन्य पक्षांना केवळ 2 जागांवर विजय मिळवता येईल.
राजस्थानमध्ये काँग्रेसला बसणार धक्का
सी व्होटरच्या सर्वेक्षणानुसार राजस्थानमधील एकूण 200 जागांपैकी भाजपला सर्वाधिक 127-137 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ही आकडेवारी काँग्रेसाठी मोठा धक्का असेल असे मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष दुसऱ्या क्रमांकावर राहिल असा अंदाज लावण्यात आला असून त्यांना 59 ते 69 जागांवर विजय मिळेल असा अंदाज आहे. तर, 2 ते 6 जागा अन्य पक्षांच्या खात्यात जाऊ शकतात.
अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांच्या निधनाची अफवा! बाबा पूर्णपणे बरे; नंदना सेन यांची माहिती
भाजपच्या हातून मध्य प्रदेश जाणार?
आगामी लोकसभेच्या निवडणुकांमध्ये भाजप विजयसाठी कंबर कसून मैदानात उतरणार आहे. मात्र, त्या आधी सत्तेत असणाऱ्या भाजपला मध्य प्रदेशात पराभवाचा सामना करावा लागेल असा अंदाज सी व्होटरच्या सर्व्हेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे. ओपिनियन पोलनुसार, मध्य प्रदेशातील एकूण 230 जागांपैकी काँग्रेसला सर्वाधिक 113-125 जागा मिळतील तर, भाजपला 104 ते 116 जागांवर विजय मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बसपाला 0 ते 2 जागा तर, अन्य पक्षांना 0 ते 3 जागा मिळतील.