पठाणकोट हल्ल्यातील म्होरक्याचा पाकिस्तानात खात्मा; शाहिद लतीफची गोळ्या झाडून हत्या

पठाणकोट हल्ल्यातील म्होरक्याचा पाकिस्तानात खात्मा; शाहिद लतीफची गोळ्या झाडून हत्या

Pakistan : पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड शाहिद लतीफ (Shahid Latif) याची पाकिस्तानात (Pakistan) गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. शाहिद हा अतिरेकी संघटनेशी संबंधित होता. या दहशतवाद्याने पठाणकोट हल्यात समन्वयाची भूमिका बजावली होती. त्याचीच आता पाकिस्तानात हत्या करण्यात आली आहे. खलिस्तानी अतिरेकी हरदीप सिंग निज्जर याच्यानंतर आणखी एक आतंकी मारला गेला आहे.

शाहिद हा भारताच्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांच्या यादीत होता. पाकिस्तानातील सियालकोट परिसरात अज्ञात बंदूकधाऱ्यांनी शाहिदवर गोळ्या झाडल्या, असे सांगण्यात येत आहे. शाहिद 41 वर्षांचा होता. त्याने 2 जानेवारी 2016 रोजी पठाणकोट येथील हल्ल्यात महत्वाची भूमिका बजावली होती. त्यानेच या हल्ल्याचे समन्वय केले होते, असेही सांगितले जात आहे.

Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानला पुन्हा भूकंपाचे हादरे; इमारती जमीनदोस्त

शाहिद लतीफ यानेच चार दहशतवाद्यांना पठाणकोट येथे हल्ला (Pathankot Attack) करण्यासाठी धाडले होते. सन 1994 मध्ये त्याला भारतात अटक करण्यात आली होती. दहशतवादी कृत्ये केल्याचा आरोप त्याच्यावर होता. भारतात तुरुंगवासाची शिक्षा भोगल्यानंतर त्याला 2010 मध्ये त्याला वाघा बॉर्डर येथून पाकिस्तानात पाठविण्यात आले होते.

सन 1999 मध्ये इंडियन एअरलाइन्सचे विमान हायजॅक करण्यात आले होते. त्याचाही आरोप शाहिद लतीफ याच्यावर होता. भारतातून बाहेर गेल्यानंतर त्याने पु्न्हा दहशतवादी कृत्यात स्वतःला जोडून घेतल्याचे राष्ट्रीय तपास संस्थेच्या तपासातून समोर आले होते. त्यामुळे भारत सरकारने त्याला मोस्ट वाँटेड अतिरेक्यांच्या यादीत टाकले होते.

पाकिस्तानची गु्प्तचर संस्था आयएसआयकडून शाहिद लतीफला सुरक्षा देण्यात येत होती. मात्र, तरीही ही सुरक्षा भेदून त्याच्यावर अज्ञातांनी गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात तो मृत्यूमुखी पडला. मागील काही दिवसांपासून पाकिस्तानात अनेक दहशतवाद्यांच्या हत्या झाल्या आहेत. दहशतवादाला खतपाणी घालून त्याला पोसणाऱ्या पाकिस्तानवरच दहशतवादी उलटल्याचे दिसत आहे. कारण, मागील काही दिवसात खुद्द पाकिस्तानातच अतिरेकी हल्ले झाले आहेत. या हल्ल्यात शेकडो पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

Israel Palestine Conflict : युद्धाचे चटके! 3 हजार मृत्यू, अनेकांचे संसार उद्धवस्त

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube