Israel Palestine Conflict : युद्धाचे चटके! 3 हजार मृत्यू, अनेकांचे संसार उद्धवस्त

Israel Palestine Conflict : युद्धाचे चटके! 3 हजार मृत्यू, अनेकांचे संसार उद्धवस्त

Israel Palestine Conflict : इस्रायलच्या भागात सुरक्षा कर्मचारी आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक (Israel Palestine Conflict) सुरूच आहे. इस्रायलच्या हवाई दलाने हमासच्या (Hamas) ताब्यात असलेल्या गाझामध्ये (Gaza) वेगाने हल्ले केले आहेत. युद्धाच्या घोषणेपासून, इस्रायली विमानांनी गाझा पट्टीतील 426 ठिकाणांना लक्ष्य केले आहे. युद्धात आतापर्यंत सुमारे तीन हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये इस्त्रायली, पॅलेस्टिनी नागरिक आणि सैनिकांचाही समावेश आहे. हमासच्या अतिरेक्यांनी दक्षिण इस्त्रायलवर (Israel Attack) हल्ले करून मोठ्या प्रमाणात घुसखोरी केली आहे. हमासने समुद्र आणि हवेतून रॉकेट हल्ले केले. तसेच देशात घुसून अंदाधुंद गोळीबार केला. यात हजारो इस्त्रायली नागरिकांचा मृत्यू झाला. त्यानंतर इस्त्रायलनेही युद्ध घोषित केलं. इस्त्रायलनेही जशास तसे उत्तर देत हल्ले सुरू केले.

Myanmar Air strike: म्यानमारमध्ये विस्थापतांच्या छावणीवर लष्कराचा हवाई हल्ला, 29 जणांचा मृत्यू

एपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या युद्धात इस्त्रायली आणि पॅलेस्टाइ या दोन्हीकडच्या जवळपास 3 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी (10 ऑक्टोबर) हमासने इस्त्रायलच्या अश्कलोन शहरावर हल्ला केला. तर दुसरीकडे इस्त्रायलनेही गाझा पट्टीला लक्ष्य केले असून बॉम्ब वर्षाव सुरूच ठेवला आहे. हमासचा संपूर्ण बिमोड करण्याच्या उद्देशाने येथील हमासच्या ठिकाणांवर हल्ले केले जात आहेत. येथील परिस्थिती अजूनही नियंत्रणात आलेली नाही.

इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिओर हयात म्हणाले की, हमासने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर अनेक देशांकडून पाठिंबा मिळाला आहे, ज्याचे आम्ही कौतुक करतो. ते म्हणाले, आम्ही मध्य पूर्व, युरोपियन युनियन आणि युनायटेड स्टेट्ससह जगभरातील अनेक देश आणि नेत्यांकडून जबरदस्त पाठिंबा आणि एकता पाहिली. आम्ही या समर्थनाची प्रशंसा करतो. इस्रायल स्वतःचा बचाव करेल.

इस्रायल-हमास युद्ध आणखी तीव्र, संपूर्ण गाझा पट्टीला वेढा घालण्याचे आदेश

पॅलेस्टाईनमध्ये हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर लेबनॉनमधून जेरुसलेममध्ये घुसखोरीचा संशय निर्माण झाला आहे. त्याचबरोबर देशातील ही घुसखोरी हाणून पाडण्यासाठी इस्रायल-लेबनॉन सीमेवर लष्कर तैनात करण्यात आल्याचे इस्रायली लष्कराने सांगितले. लष्कराने एका निवेदनात म्हटले आहे की, लेबनीजच्या हद्दीतून अनेक संशयित इस्रायली हद्दीत घुसखोरी केल्याचा अहवाल प्राप्त झाला होता, त्यानंतर सैन्य तैनात करण्यात आले आहे. आता युद्धाचा काय निकाल लागेल हे कळेलच मात्र, या युद्धाची जबरदस्त किंमत महिला आणि लहान मुलांना मोजावी लागत आहे. दोन्ही बाजूचे हजारो नागरिक या युद्धात मारले गेले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube