इस्रायल-हमास युद्ध आणखी तीव्र, संपूर्ण गाझा पट्टीला वेढा घालण्याचे आदेश

इस्रायल-हमास युद्ध आणखी तीव्र, संपूर्ण गाझा पट्टीला वेढा घालण्याचे आदेश

Israel Palestine War : इस्रायलच्या भागात सुरक्षा कर्मचारी आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच आहे. इस्रायलच्या हवाई दलाने हमासच्या ताब्यात असलेल्या गाझामध्ये वेगाने हल्ले केले आहेत. युद्धाच्या घोषणेपासून, इस्रायली विमानांनी गाझा पट्टीतील 426 ठिकाणांना लक्ष्य केले आहे. युद्धात आतापर्यंत सुमारे 800 इस्रायली लोकांचा मृत्यू झाला आहे.

शनिवारी (7 ऑक्टोबर) हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर एकामागून एक प्रचंड हवाई हल्ले केले. हमासच्या हल्ल्यानंतर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी व्हिडिओ संदेश जारी केला. यामध्ये त्यांनी इशारा दिला आहे की, इस्रायलला लक्ष्य करणाऱ्या एकाही दहशतवाद्याला सोडले जाणार नाही.

हमासच्या हल्ल्याचा बदला म्हणून इस्रायली हवाई दलाने सोमवारी अनेक ऑपरेशनल मुख्यालयांवर तसेच हमासचे नेते राहत असलेल्या विविध इमारतींवर हल्ला केला. इस्रायली हवाई दलाच्या म्हणण्यानुसार, हवाई दलाने तीन मजली मुख्यालय आणि हमासचे वरिष्ठ नौदल कमांडर मुहम्मद काश्ता यांच्याशी संबंधित मुख्यालयावरही हल्ला केला. इस्रायलवर हमासच्या रॉकेट हल्ल्यात 800 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

Israel Hamas War: सोनं-चांदी महागलं; इस्रायल-हमास युद्धाचा परिणाम

इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिओर हयात म्हणाले की, हमासने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर अनेक देशांकडून पाठिंबा मिळाला आहे, ज्याचे आम्ही कौतुक करतो. ते म्हणाले, आम्ही मध्य पूर्व, युरोपियन युनियन आणि युनायटेड स्टेट्ससह जगभरातील अनेक देश आणि नेत्यांकडून जबरदस्त पाठिंबा आणि एकता पाहिली. आम्ही या समर्थनाची प्रशंसा करतो. इस्रायल स्वतःचा बचाव करेल.

Claudia Goldin यांना अर्थशास्त्रातील नोबल पुरस्कार जाहीर

पॅलेस्टाईनमध्ये हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर लेबनॉनमधून जेरुसलेममध्ये घुसखोरीचा संशय निर्माण झाला आहे. त्याचबरोबर देशातील ही घुसखोरी हाणून पाडण्यासाठी इस्रायल-लेबनॉन सीमेवर लष्कर तैनात करण्यात आल्याचे इस्रायली लष्कराने सांगितले. लष्कराने एका निवेदनात म्हटले आहे की, लेबनीजच्या हद्दीतून अनेक संशयित इस्रायली हद्दीत घुसखोरी केल्याचा अहवाल प्राप्त झाला होता, त्यानंतर सैन्य तैनात करण्यात आले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube