Claudia Goldin यांना अर्थशास्त्रातील नोबल पुरस्कार जाहीर

Claudia Goldin यांना अर्थशास्त्रातील नोबल पुरस्कार जाहीर

अमेरिकेतील अर्थशास्त्रज्ञ क्लॉडिया गोल्डिन(Claudia Goldin ) यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. रॉयल स्वीडीश अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सकडून या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.

आल्फ्रेड नोबेल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा अर्थशास्त्रातील Sveriges Riksbank हा पुरस्कार देण्यात आला आहे. क्लॉडिया गोल्डिन या हार्वर्ड विद्यापीठाच्या प्रोफेसर आहेत. त्यांनी महिलांच्या श्रमिक बाजारपेठेतील योगदानावरील सर्वसमावेशक संशोधन केलं होतं. त्यामुळे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. क्लॉडिया गोल्डिन यांनी महिलांच्या श्रम बाजारपेठेतल्या योगदानाबद्दल महिलांचं उत्पन्न, श्रम याबद्दल संशोधन केलं. अर्थशास्त्रात महिलांच्या श्रम बाजारातील परिणामांबद्दलची समज वाढवल्यान त्यांनी केलेल्या संशोधनामुळे मदत मिळाली आहे.

World Cup 2023 : भारताची विजयी सलामी ! विराट, राहुलच्या झुंजार खेळीने ऑस्ट्रेलियावर मात

सध्या जगातील सर्वात प्रतिष्ठेचा मानला जाणाऱ्या नोबेल पुरस्कारांची (Nobel Prize) सध्या घोषणा सुरू आहे. यंदा शांततेचा नोबेल पुरस्कार इराणच्या नर्गिस मोहम्मदी यांना जाहीर करण्यात आला असून नर्गिस मोहम्मदी यांनी इराणमधील (Iran) महिला अत्याचाराविरुद्धच्या लढ्यात मोलाचं योगदान दिले आहे. नर्गिस मोहम्मदी यांनी इराणमधील महिलांवरील अत्याचाराविरुद्ध मोठा लढा उभारला. मानवी हक्क आणि महिला स्वातंत्र्याचा प्रसार करण्यासाठी त्यांनी उभारलेल्या लढ्यांची आणि केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला करण्यात आला.

Raj Thackeray : CM ठाण्याचे, लोकांचा आक्रोश त्यांना.. टोलदरवाढीवर राज ठाकरेंचा संताप

यासोबतच यंदाचा साहित्यातील नोबेल पुरस्कार नॉर्वेजियन लेखक जॉन फॉसे (Jon Fosse) यांना जाहीर करण्यात आला आहे. नाटकांसाठी आणि गद्यासाठी त्यांना यावर्षीचा साहित्यातील नोबेल जाहीर करण्यात आला आहे. साहित्यातील 2022 चा नोबेल पुरस्कार फ्रेंच लेखिका एनी अर्नो यांना देण्यात आला होता. एर्नी फ्रेंच लेखिका आणि साहित्याच्या प्राध्यापक असून, त्यांचे साहित्य हे आत्मचरित्रात्मक आणि समाजशास्त्रावर आधारित आहे.

रसायनशास्त्रातील यंदाचा नोबेल पुरस्कार मौंगी जी, बावेंडी, लुईस ई, ब्रुस आणि एलॅक्सी आई यांना घोषित करण्यात आला आहे. क्वांटम डॉट्सच्या संशोधनासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. तर, कॅटालिन कॅरिको आणि ड्र्यू वेसमन यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे. न्यूक्लिओसाइड बेस मॉडिफिकेशनशी संबंधित शोधांसाठी त्यांना हा सन्मान देण्यात आला असून या शोधामुळे कोरोना व्हायरस म्हणजेच COVID-19 विरुद्ध प्रभावी mRNA लस विकसित करण्यात मदत झाली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube