Raj Thackeray : CM ठाण्याचे, लोकांचा आक्रोश त्यांना.. टोलदरवाढीवर राज ठाकरेंचा संताप

Raj Thackeray : CM ठाण्याचे, लोकांचा आक्रोश त्यांना.. टोलदरवाढीवर राज ठाकरेंचा संताप

Raj Thackeray : टोलच्या दरवाढीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Raj Thackeray) मैदानात उतरली असून ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव मागील चार दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. ठाण्यातील आनंदनगर टोलनाका  (Toll Rate ) परिसरात त्यांनी उपोषण सुरू केले होते. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे येऊन भेट दिल्यानंतर जाधव यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत राज्य सरकारवर जोरदार टीका केली.  राज ठाकरे म्हणाले, रस्ते नीट बांधले जाणार नसतील तर टोल कशाला वसूल करता? टोलवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखल केलेली याचिका का मागे घेतली? कुणाच्या सांगण्यावरून घेतली? असे सवाल त्यांनी केले. मुख्यमंत्री ठाण्याचे आहेत. निवडणुका तोंडावर आल्यात. लोकांचा आक्रोश त्यांना परवडणारा नाही, असा इशारा ठाकेर यांनी दिला.

Rohit Pawar : ‘अख्खा महाराष्ट्र भिकारी होईल पण, सावंत’.. रोहित पवार असं का म्हणाले?

ठाण्यासह पाचही टोलनाक्यांवर दरवाढ झाली आहे. या दरवाढीच्या निषेधार्थ अविनाश जाधव यांनी उपोषण सुरू केले होते. अविनाशला काल फोन केला आणि सांगितलं की उपोषण वगैरे आपलं काम नाही. मी उद्या सकाळी ये असं त्याला म्हटलं. गेले अनेक वर्ष मनसेने अनेक आंदोलने केली. राज्यातील अधिकृत आणि अनधिकृत 65-67 टोलनाके बंद केले. शिवसेना भाजपाच्या जाहिरनाम्यात टोलमुक्त महाराष्ट्र करू असं जाहीर केलं होतं. 2014,2017 लाही जाहीर केलं. पण, आज त्यांना हे प्रश्न विचारले जात नाहीत. प्रत्येक वेळी मलाच विचारलं जातं पण त्याचे रिझल्ट अनेकांना दिसत नाहीत, असे राज ठाकरे म्हणाले.

आता मुख्यमंत्र्यांनाच भेटणार

मी अविनाशला फोन करून सांगितलं की उपोषण वगैरे आपलं काम नाही. लोकांसाठी जीव गमावू नकोस. एक माणूस गेल्याने यांना काही फरक पडत नाही, असे म्हणत उपोषण मागे घ्यायला लावल्याचे राज ठाकरे म्हणाले. त्यानंतर या प्रश्नी आता मुख्यमंत्री भेट घेणार असल्याचे राज ठाकरेंनी सांगितले.

मला लोकांचं आश्चर्य वाटतं की निवडणुकीच्या काळात थापा मारतात. तुम्हाला पिळ पिळ पिळवटतात आणि तुम्हाला त्यांनाच मतदान करायचं आहे. जी तुमच्याशी खोटं बोलत आहेत, त्यांना कधी कळलंच नाही आपण ज्या गोष्टी करतोय त्या चुकीच्या आहेत. विरोधात मतदान झालंच नाही तर त्यांना समजणार कस असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

खेडो-पाडी पक्ष रुजवणारा ठाकरेंचा शिलेदार हरपला; शिवसेनेचे जिल्हा संघटक अविनाश रहाणेंचे निधन

follow us
  • fb
  • instagram
  • youtube