Download App

दोन कोटींची डिफेंडर गाडी अन् पोलिसाच्या घरी दीड कोटी; आ. धसांचे आकावर गंभीर आरोप

भाजप आमदार सुरेश धस सध्या चांगलेच चर्चेत आहेत. आज आमदार धस यांनी थेट देवगिरी बंगला गाठत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.

Suresh Dhas : भाजप आमदार सुरेश धस सध्या चांगलेच चर्चेत आहेत. आज आमदार धस यांनी थेट देवगिरी बंगला गाठत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ait Pawar) यांची भेट घेतली. या भेटीत दोघांत काय चर्चा झाली याची माहिती धस यांनी प्रसारमाध्यमांना दिली. तसेच काही धक्कादायक खुलासे केले ज्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. वाल्मिक कराडवर (Walmik Karad) धस यांनी वसुलीचे आरोप केले आहेत. ह्यांचे धंदे वेगवेगळे आहेत. या जितक्या टोळ्या आहेत त्यांच्यावर मोक्का लावला पाहिजे अशी मागणी धस (Suresh Dhas) यांनी केली आहे.

धस पुढे म्हणाले, वाल्मिक कराड अतिशय गंभीर प्रकरण आहे. कराडने मागील काही काळात मोठ्या टोळ्या तयार करण्याचं काम केलंय. या सगळ्या टोळ्यांवर मोक्का लावला नाही तर आज तिहार जेलमध्ये जे होतंय, मुंबईत सलमान खानपर्यंत जे येतंय तसा काहीसा प्रकार होऊ शकतो.

ज्या बँका बुडाल्या त्या बुडाल्यानंतर पोलीस तपास झाला त्यात एका पोलीस अधिकाऱ्याच्या घरी दीड कोटी रुपये सापडले. एक मल्टिस्टेट को ऑपरेटिव्हला दम देऊन दोन कोटींची डिफेंडर गाडी वाल्मिक कराड यांनी घेतली. अशा प्रकारच्या पैशांच्या देवाणघेवाणीमुळे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे कुणाच्या बाजूने उभे राहिले तर या पैसे बुडवणाऱ्या लोकांच्या बाजूने असा गंभीर आरोप आमदार सुरेश धस यांनी केला.

सुरेश धस आणि वाल्मिक कराड दोघांचीही चौकशी झाली पाहिजे.. एकनाथ खडसेंची मागणी

ज्या पोलीस अधिकाऱ्याकडे दीड कोटी रुपये सापडले त्याला वाचवायला वाल्मिक कराड होते. वाल्मिक कराड हा चोरांचा, दरोडेखोरांचा सगळ्यांचाच साथीदार आहे. आणि आता दोन दिवसांत जिथे कुठे मोर्चा असेल तिथे मी ह्या लोकांच्या प्रॉपर्टीचे आकडे जाहीर करणार आहे.

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत विचारले असता धस म्हणाले, मी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांनीच तशी मागणी केली आहे. मी आका आणि आकांचे आका म्हणत होतो. पण मी आता अगदी स्पष्ट बोलत आहे. मी धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितलेला नाही असे भाजप आमदार सुरेश धस म्हणाले.

धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक, अवादा कंपनीकडे मागितली 3 कोटींची खंडणी; सुरेश धस यांचे गंभीर आरोप

follow us