धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक, अवादा कंपनीकडे मागितली 3 कोटींची खंडणी; सुरेश धस यांचे गंभीर आरोप
MLA Suresh Dhas Allegations On Dhananjay Munde’s bungalow : बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत. धनंजय मुंडेंच्या (Dhananjay Munde) बंगल्यावर अवादा कंपनीकडे तीन कोटी रुपयांची मागणी केली होती, असं खळबळजनक वक्तव्य आमदार सुरेश धस यांनी केल्याचं समोर आलंय.
सुरेश धस म्हणाले की, 14 जून 2024 रोजी वाल्मिक कराड, नितीन बिक्कड, अवादा कंपनीचे शुक्ला या सर्वांची बैठक धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर झाली. त्यावेळी धनंजय मुंडे यांचे पीए जोशी त्यांच्या माध्यमातून अवादा कंपनीचे वरिष्ठ (Santosh Deshmukh Murder) हे त्यांच्याबोरबर संधान साधत होते. परंतु तोपर्यंत आय एनर्जी नावाच्या कंपनीचे वाल्मिक कराड यांनी काम बंद पाडले. धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर अवादा कंपनीकडे तीन कोटी रुपयांची मागणी केली गेली, त्यापैकी दोन कोटींच्या खंडणीची डील झाली.
महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला आमदार सुरेश धस…. अमोल मिटकरींची पुन्हा घणाघाती टीका
नितीन बिक्कड याला लवकरात लवकर उचलण्याची गरज आहे. पोलिसांनी त्याला पकडले तर यातील बरेचसे गुपितं बाहेर येतील असं देखील सुरेश धस म्हणालेत. 50 लाख रुपये निवडणूक काळात यांनी त्या कंपनीकडून घेतले. उर्वरीत दीड कोटीच्या मागणीसाठी गेले, तेव्हा वॉचमनला मारले. तेव्हा संतोष देशमुख तिथे मधे गेला आणि त्यांचा अमानवीय कृत्य करुन मर्डर केला.
तुम्ही मला मतं दिली म्हणजे तुम्ही काय माझे….अजित पवार कार्यकर्त्यांवर का भडकले? काय घडलं?
नितीन कुलकर्णी नावाचा व्यक्ती आका वाल्मिक कराडचा (Walmik Karad) पीए आहे. तो 17 मोबाईल नंबर वापरतो, नितीन कुलकर्णीला अटक करुन 17 मोबाईल जप्त करा. वाल्मिक कराड यांची जिथे जिथे जमीन सापडते, ती 100 ते 150 एकरने सापडते. 50 बॅंक खाते आतापर्यंत सील केलेत. उर्वरीत करावेत, अशी मागणी आहे. 50 अकाउंट्सच्या पुढे ईडीची चौकशी लागते. यामध्ये ईडी येईल. ईडीच्या अधिकाऱ्यांना, राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना सुद्धा पत्र लिहिणार असल्याचं धस यांनी स्पष्ट केलंय.
वाल्मिक कराडच्या बॉडीगार्डला सुद्धा तपासात घ्या, अशी मागणी देखील सुरेश धस यांनी केलीय. धनंजय मुंडे यांचा यात किती सहभाग आहे, ते तपासावा. त्यात त्यांचा सहभाग असेल तर ते सुद्धा या गुन्ह्यात येतील. नैतिकता आणि धनंजय मुंडे यांची गाठच राहिलेली नाही.अजित पवारांनी याबाबत राजीनाम्याचा निर्णय करावा, मुख्यमंत्र्यांनी आजपर्यंत मी केलेल्या सर्व मागण्या पूर्ण केल्या आहेत, असं देखील सुरेश धस म्हणाले आहेत.