Thackeray Group Office : उद्धव ठाकरे आणखी एक दणका मिळाला आहे. कारण ठाकरे गटाच्या मुंबईतील वांद्रे पूर्वमधील अनधिकृत कार्यालयावर बीएमसीने कारवाई केली आहे. या भागात मोकळ्या जागेत शिवसेना ठाकरे गटाकडून अनधिकृत पद्धतीने बांधकाम करण्यात आलं होतं. परवानगीशिवाय तेथे बोर्ड लावण्यात आले होते. कार्यालया तयार करण्यात आलं होतं. त्यामुळे त्यावर कारवाई करण्यात आली आहे. ( BMC demolished illegal Office of Thackeray Group in Vandre )
अजितदादा बोलले पण, भुजबळांनीच प्रदेशाध्यक्षपदावर ठोकला दावा; सांगितला ‘हा’ फॉर्म्युला
मुंबई महानगर पालिकेच्या नेहमीच्या स्टाईलने बेधकपणे ही कारवाई करण्यात आली. यावेळी त्या ठिकाणी ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही होते. त्यांनी या कारवाईला विरोध केला. पण या कार्यालयाचं बांधकाम करताना महापालिकेची पूर्वपरवानगी घेण्यात आली नव्हती तसेच तशा प्रकारची कोणतीही विचारणा देखील बीएमसीला करण्यात आली नव्हती अशी माहिती यावेळी मुंबई महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिली.
या कार्यलयाचं पाडकाम सुरू असताना या परिसरात ताणावाच वातावरण निर्माण झालं होतं. तर महानगर पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. त्यावेळी ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी यावर प्रतिक्रिया देत या कारवाईवर टीका केली.
सावंत म्हणाले की, महापालिकेने केलेली ही कारवाई अन्यायकारक आहे. हे कार्यालय पोलीस स्टेशनच्या समोर आहे. ते कार्यालय 40-50 वर्ष जुन आहे. तसेच ही कारवाई करताना महापालिकेने अगोदर नोटीस द्यायला हवी होती. तशी कोणतीही नोटीस न देती अचानक कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. हे वैभावाचे द्योतक आहे. अलं अरविंद सावंत म्हणाले.