Download App

सत्ताधारी आमदारांवर महापालिका मेहरबान; मुंबईकरांचा पैसा सरकारच्या बापाचा का? काँग्रेसचा संतप्त सवाल

BMC Fund Allocation : राज्याच्या राजकारणात निधी वाटपावरुन मोठा भेदभाव झाल्याचे दिसून आले आहे. मुंबईचा (Mumbai News) कारभार चालणाऱ्या महानगरपालिकेने (BMC Fund Allocation) सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना मोकळ्या हाताने निधीवाटप केले तर विरोधी पक्षातील आमदारांना मात्र निधी दिलाच नाही. आता यावरुन राजकारण तापले आहे. मुंबईकरांच्या कष्टाचा पैसा मुंबईकरांच्या विकासासाठी देताना भेदभाव करायला पैसा काय सरकारच्या बापाचा आहे का? असा संतप्त सवाल काँग्रेस मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी केला आहे.

त्यांनी पुढं म्हटले आहे की भारतीय जनता पक्षाचे सरकार विरोधकांशी सूडबुद्धीने वागते हे काही नवे नाही, विरोधी पक्षांची सर्वबाजूंनी कोंडी करण्याचा भाजपा सरकार सातत्याने प्रयत्न करत असते. निधी वाटपात भेदभाव करण्याचे प्रकारही उघड झालेले आहेत. मुंबईतील केवळ सत्ताधारी पक्षांच्याच आमदारांना 500 कोटी रुपयांची खैरात करणे व विरोधी पक्षांच्या एकाही आमदाराला एक फुटकी कवडीही न देणे हे नीच प्रकारचे राजकारण आहे.

शिखर बॅंक घोटाळा प्रकरणी अजितदादांना दिलासा; दुसऱ्यांदा पोलिसांकडून क्लोजर रिपोर्ट दाखल

मुंबईतील 36 आमदारांपैकी सत्ताधारी पक्षाच्या 21 आमदारांना 500 कोटी रुपयांची खैरात वाटली पण काँग्रेससह विरोधी पक्षांच्या 15 आमदारांपैकी एकालाही फुटकी कवडीही दिली नाही. आपल्या मतदार संघातील विकास कामांसाठी प्रत्येक आमदाराला निधी दिली जातो. या निधीचे समान वाटप करावे अशी अपेक्षा असते पण कधी सत्ताधारी पक्षांच्या आमदारांना झुकते माप दिले तर तेही समजून घेतले असते पण विरोधकांना एक पैसाही द्यायचा नाही ही राजकीय प्रवृत्ती अत्यंत खालच्या पातळीची आहे. विरोधी पक्षाच्या आमदारांनी पालक मंत्र्याकडे वेळोवेळी पत्र पाठवली तरीही त्यांच्याकडे लक्ष दिले गेले नाही पण सत्ताधारी भाजपा व शिंदे गटाच्या आमदारांना मात्र तातडीने निधी उपलब्ध करुन दिलेला आहे, असे अतुल लोंढे म्हणाले.

काँग्रेसच्या दिल्लीतील नेतृत्वाने पत्र द्यावे, तोपर्यंत वंचित ‘मविआचा’ भाग होणार नाही : आंबेडकरांचा तोरा कायम

सरकार आमदारांना विकास कामांसाठी निधी देतो म्हणजे काही उपकार करत नाही, जनतेचाच पैसा जनतेसाठी दिला जातो. विरोधी पक्षाच्या आमदारांना विकास निधी न देणे म्हणजे त्या मतदारसंघातील जनतेला विकासापासून वंचित ठेवण्याचा प्रकार आहे. शिंदे-भाजपा सरकारने निधी वाटपात मोठा भेदभाव केलेला आहे. महाराष्ट्रातील राजकारण इतक्या खालच्या थराला गेले हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. आगामी निवडणुकीत मतदान करताना जनतेने शिंदे-भाजपा सरकार करत असलेला भेदभाव लक्षात ठेवावा व त्यांना मतपेटीतून चोख उत्तर द्यावे, असे आवाहनही अतुल लोंढे यांनी केले आहे.

follow us

वेब स्टोरीज