Download App

ताडपत्री काढणार नाही, पुढील आदेशापर्यंत कबुतरखाना बंदच राहणार; BMC ची रोखठोक भूमिका

पुढील आदेशापर्यंत कबुतरखाना बंदच राहणार. न्यायालयाने दिलेल्या नियमांचे पालन महानगरपालिकेकडून केले जाणार, असं महापालिकेनं स्पष्ट केलं.

  • Written By: Last Updated:

Municipal Corporation On Kabutar Khana Dadar: मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) कबुतरखाने (Kabutar Khana) बंद करण्याचा निर्णय दिल्यानंतर मुंबई महानगरपालिकेनं (Mumbai Municipal Corporation) ताडपत्री टाकून दादर कबुतरखाना बंद केला. मात्र, जैन समुदायाकडून (Jain community) याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. आज (६ ऑगस्ट) दादर कबुतरखाना परिसरात जैन समाजानं मोठं आंदोलन करत ताडपत्री फाडून टाकली आणि कबुतरखाना पुन्हा सुरू केला. दरम्यान, न्यायालयाने दिलेल्या नियमांचे पालन महानगरपालिकेकडून केले जाणार असणार असल्याचं महापालिकेनं स्पष्ट केलं.

पहिली, दुसरीला एकच कविता; शिक्षण विभागाचा नवा घोळ आला समोर, नेमकं प्रकरण काय? 

जैन समाजाकडून मोठं आंदोलन…
गेल्या काही दिवसांपासून कबुतरखान्यावरून सुरू असलेल्या वादानंतर न्यायालयाने कबुतरखाने बंद करा, असे आदेश दिले होते. बुधवारी सकाळी दादर येथील कबुतरखाना बंद करण्याच्या महापालिकेच्या निर्णयाविरुद्ध जैन समाजाने मोठं आंदोलन केलं. आंदोलकांनी ताडपत्री काढून टाकण्याचा प्रयत्न केलं. तिथं दाणे टाकले. या आंदोलनात महिला सुध्दा आघाडीवर होत्या. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची देखील झालाी. आंदोलकांनी कबुतरखान्यात घुसून ताडपत्री काढून कबुतरखाना सुरू करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, कबुतरखान्यांविषयी न्यायालयासमोर परिस्थिती मांडण्यासाठी एक समिती स्थापन केली जाणार आहे. ही समिती न्यायालयासमोर आपली निरीक्षण मांडेल. तर महानगरपालिका कबुतरखान्यांवरील ताडपत्री काढणार नाही, महानगरपालिकेकडून न्यायालयाने दिलेल्या नियमांचे पालन केले जाणार आहे. दादर कबुतरखान्याजवळ झालेल्या आंदोलनानंतर मुंबई महानगरपालिका न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे पालन करेल असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

ब्रेन मॅटर डिजिटल अ‍ॅपचे लोकार्पण! अ‍ॅपच्या सहाय्याने मानसोपचार होणार सुलभ… 

न्यायालयाच्या आदेशाचे पालन करू…
मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत झालेल्या चर्चेत राज्य सरकार आणि महानगरपालिकेचं एकमक झालं आहे. न्यायाल जे आदेश देतील त्यानुसारत आम्ही कारवाई करू, सध्या न्यायालयाने आम्हाला (महानगरपालिका) आणि पोलिसांना जे आदेश दिले आहेत, त्याचे आम्ही पालन करत आहोत, असं महानगरपालिकेच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

फडणवीसांनी घेतली बैठक…
मुंबई महानगरपालिकेने दादर कबुतरखाना ताडपत्रीने झाकून बंद केल्यानंतर जैन समाज नाराज झाला होता. तर राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही दादर कबुतरखाना बंद होऊ नये यासाठी कंबर कसली होती. या पार्श्वभूमीवर, मंगळवारी मंत्रालयात देवेंद्र फडणवीस, अजित पवार, वनमंत्री गणेश नाईक, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा, महापालिका आयुक्त भूषण गगराणी आणि वन विभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती.

न्यायालयाने कबुतरखाने बंद करण्याचे आदेश का दिले?

कबुतरांच्या विष्ठेमुळे आणि पिसांमुळे अनेक नागरिकांना श्वसनाचे आजार झाले होते. कबुतरांच्या मोठ्या संख्येमुळे परिसरात वेगाने आजार पसरत असल्याने उच्च न्यायालयाने मुंबईत कबुतरखाने बंद करण्याचे आदेश दिले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, मुंबई महानगरपालिकेने सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खायला घालण्यास बंदी घातली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबईत कबुतरखान्यांवर कारवाई करण्यात येत आहे.

follow us