Download App

काय सांगता! राज्य सरकार शाहरुख खानला देणार ९ कोटी; चूक नेमकी कुणाची?

मन्नत बंगला वांद्रे पश्चिम परिसरात आहे. राज्य सरकारने मूळ मालकाला पट्ट्यावर दिलेल्या जमिनीवर या बंगल्याचे बांधकाम करण्यात आले आहे.

Shah Rukh Khan News : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने एक याचिका दाखल केली होती. मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना जमिनीसाठी जास्त रक्कम अदा करण्यात आल्याची बाब या याचिकेत नमूद करण्यात आली आहे. याच जागेवर आज शाहरुखचा मन्नत बंगला उभा आहे. आता दोन वर्षांनंतर राज्य सरकार या याचिकेला मंजुरी देण्याची शक्यता आहे. जर असे झाले तर पुढील कार्यवाही होऊन शाहरुख खानला कोट्यावधी रुपये मिळू शकतात. मन्नत बंगला वांद्रे पश्चिम परिसरात आहे. राज्य सरकारने मूळ मालकाला पट्ट्यावर दिलेल्या जमिनीवर या बंगल्याचे बांधकाम करण्यात आले आहे. व्यवहाराला मंजुरी मिळाल्यानंतर ही जमीन मूळ मालकाने शाहरुख खानला विक्री केली होती.

रजिस्टर्ड कराराच्या माध्यमातून तब्बल 2446 स्क्वेअर मीटर परिसरातील ही प्रॉपर्टी शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या नावावर स्थानांतरीत करण्यात आली होती. लीजवर दिलेल्या प्रॉपर्टीला कंप्लिट ओनरशीपमध्ये रुपांतरीत करण्यास मंजुरी देण्याच्या राज्य सरकारच्या धोरणाचा लाभ घेण्याचा विचार दोघांनी केला. दोघांनी मार्च 2019 मध्ये रेडी रेकनर दराच्या 25 टक्के रक्कम अदा केली. ही रक्कम जवळपास 27.50 कोटी रुपये इतकी होती.

धक्कादायक! सलमान खाननंतर शाहरुख खानला धमकी; पोलिसांत गुन्हा दाखल

मीडिया रिपोर्ट्सनुसार शाहरुख खानला कन्व्हर्जन फी गणना करताना राज्य सरकारकडून काहीतरी चूक झाल्याचे लक्षात आले. कन्व्हर्जन फीसच्या गणनेच्या प्रक्रियेत जमिनीऐवजी बंगल्याच्या किंमतीचा विचार करण्यात आला होता. अधिकाऱ्यांकडून झालेली ही चूक सप्टेंबर 2022 मध्ये खान परिवाराच्या लक्षात आली. नंतर गौरी खानने एमसीडी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी ही बाब निदर्शनास आणून दिली.

जास्तीची रक्कम दिली गेली होती ती रक्कम परत करावी अशी मागणीही करण्यात आली. ही रक्कम जवळपास 9 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. फ्री प्रेस जर्नलच्या रिपोर्टनुसार सूत्रांनी सांगितले की जिल्हाधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारला पाठवला आहे. राज्य सरकारकडून मंजुरी मिळताच जास्तीची रक्कम शाहरुख खान कुटुंबियांना परत देण्यात येईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

IPL 2025 साठी नाही होणार मेगा लिलाव, शाहरुख खान का संतापला? वाचा, बैठकीची Inside Story

follow us