कॉल डिटेल्स रेकॉर्ड कोणी-कुणाचे काढू शकतं का ? नेमकी प्रोसेस कशी असते ?

call detail record -इनकमिंग, आऊटगोईंग, टॉवर लोकेशनचा डाटा, मोबाइल कंपन्यांकडून पोलिस विभागाला मिळतो. त्या डाटाच्या आधारे पोलिस तपास करतात.

Cdr Anjali Damnia

Cdr Anjali Damnia

महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर, त्यांची बहिण प्रतिभा चाकणकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशोक खरातला कॉल्स केले होते. त्याचे सीडीआर म्हणजे कॉल डिटेल रेकॉर्ड आपल्याकडे असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय. दमानिया यांच्या दाव्याने मोठा राजकीय बॉम्ब फुटला. मुख्यमंत्र्यांनी थेट याप्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहे. एका प्रायव्हेट डिटेक्टिव्ह याने मला हे कॉल डिटेल्स रेकॉर्ड पाठविला होता. क्लॉडवर ही माहिती मी टाकली होती, असे आता अंजली दमानिया या सांगत आहे. परंतु खरंच असे कॉल डिटेल्स कोणी कुणाचे काठू शकतं का ? कॉल डिटेल्स कसे काढले जातात. त्यासाठी काय प्रक्रिया आहे तेच आपण पाहुया…


सीडीआर कधी काढले जातात ?

सीडीआर काढण्याचा अधिकार केवळ शासकीय तपास यंत्रणांना आहे. म्हणजे पोलिस यंत्रणा गुन्ह्याच्या तपासामध्ये मोबाइल सर्व्हिस प्रोव्हाडर कंपनीकडून सीडीआर घेऊ शकतात. यावरून गुन्ह्याचा तपासाला दिशा मिळते. तसेच एखादी व्यक्ती हरविलेली असेल त्याची मिसिंगचा तक्रार असेल सीडीआर काढला जातो. एखाद्या एनसी सारखा गुन्हा असेल, तर कोर्टाच्या आदेशाने पोलिस यंत्रणा सीडीआर काढते. पोलिस अधिकारी आणि गुन्हेगारांचा संबंध असेल. त्यातून एखादी गैर घटना घडलेली असेल तर अशा वेळी पोलिस अधीक्षक, पोलिस आयुक्त यांच्या आदेशाने सीडीआर काढला जातो. पोलिस अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीसाठी असे सीडीआर काढले जातात.


सीडीआरमध्ये काय-काय असतं ?

पोलिस अधिकारी हे मोबाइल सर्व्हेस प्रोव्हडरकरून असे कॉल डिटेल्स मिळवितात. आरोपी याचा कुणा-कुणाशा संपर्क झालेला आहे. त्याचे नंबर, कॉल्सचा वेळ , इनकमिंग, आऊटगोईंग, टॉवर लोकेशनचा डाटा, मोबाइल कंपन्यांकडून पोलिस विभागाला मिळतो. त्या डाटाच्या आधारे पोलिस तपास करतात. त्यानंतर गुन्ह्याचे चार्जशिट न्यायालयात दाखल झाल्यानंतर कॉल डिटेल्सचा पुरावा ग्राह्य धरला जातो. त्यासाठी मोबाइल कंपन्यांच्या नोडल ऑफिसरला न्यायालयात साक्षीसाठी यावे लागते.


कोणी-कुणाचा कॉल्स डिटेल्स काढू शकतो का ?

आता नवीन अॅप आलेले आहेत. त्यात स्वत:च्या मोबाइलचा सीडीआर काढता येतो. परंतु दुसऱ्या व्यक्तीचा सीडीआर काढता येत नाही. त्या व्यक्तीचे मोबाइल क्रमांक, मोबाइल हॅण्डसेट, IMEI नंबर असेल तर त्यामध्ये माहिती टाकून सीडीआर काढला जातो. दोघांचे मोबाइल असेल तर असे कॉल डिटेल्स काढू शकतात. परंतु दोघांचे वैयक्तिक काढू शकतात. त्रयस्त व्यक्तींचे मोबाइल नंबर टाकून कॉल डिटेल्स रेकॉर्ड काढले जाऊ शकत नसल्याचे पोलिस अधिकारी सांगतात. त्यामुळे सहजासहजी कुणी-कुणाचे कॉल्स डिटेल्स काढू शकत नाही.


काय सांगतात सायबर तज्ज्ञ?

याबाबत लेट्सअपने निवृत्ती पोलिस अधिकारी व पुण्यातील सायबर तज्ज्ञ सुनील पवार यांच्या काही माहिती समजून घेतली. ते म्हणतात काही वेळेस सीडीआर काढणाऱ्या एजन्सीची माहिती हॅक करून असे सीडीआर मिळविले जातात. प्रोफेशन हॅकर्स असे करतात. पैशाच्या मोबदल्यास असे सीडीआर विकली जातात. गुन्ह्यात पोलिसांनी मागणी केल्यानंतर मोबाइल सर्व्हिस प्रोव्हडरकडूनच सीडीआर मिळविले जातात. इतर वेळेस कंपन्यांकडून कोणी कोणीचे सीडीआर मिळू शकत नाही. मोबाइल कंपन्या असे सीडीआर देत नाहीत. तसेच इतर ऑनलाइन अॅप्लिकेशन वापरून सीडीआर काढता येत नाहीत, असे सायबर तज्ज्ञ सुनील पवार यांचे म्हणणे आहे.

त्यामुळे एकतर अंजली दमानिया यांना हे सीडीआर हे हॅकिंग करून कोणी तरी दिले असतील किंवा तपास अधिकाऱ्याकडून दमानिया यांना सीडीआर मिळालेली असतील. परंतु इतर मार्गाने मात्र हे सीडीआर दमानिया यांना मिळू शकत नाही. आता या प्रकरणी पोलिस चौकशी सुरू आहे. त्यानंतर सीडीआर अंजली दमानिया यांच्याकडे कसे गेले हे उघडकीस येईल.

Exit mobile version