NEET पेपरफुटी प्रकरणाचं अहिल्यानगर कनेक्शन! आरोपीचा साथीदार लोखंडे ताब्यात चौकशी सुरू
NEET paper leak case चा तपास आता CBI कडे सोपवण्यात आला आहे. पण, ‘नीट’चा पेपर नेमका फुटला कसा? याबद्दलची धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे.
Ahilyanagar connection of NEET paper leak case Accomplice of accused in Nashik arrested by police : 3 मे 2026… देशातील 24 लाख विद्यार्थी डॉक्टर होण्याचं स्वप्न घेऊन परीक्षा केंद्रावर पोहोचले. पण त्यांना माहीत नव्हतं की, ज्या पेपरसाठी त्यांनी रात्रंदिवस एक केला, तो पेपर आधीच काही लोकांच्या मोबाईलवर फिरत होता. 180 पैकी चक्क 150 प्रश्न लीक झालेल्या हस्तलिखित संचातून जसेच्या तसे आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, सरकारने NEET UG 2026 परीक्षा रद्द केली असून याचा तपास आता CBI कडे सोपवण्यात आला आहे. पण, ‘नीट’चा पेपर नेमका फुटला कसा? याबद्दलची धक्कादायक माहिती आता समोर येऊ लागली आहे.
देशात आर्थिक परिस्थिती आणखी बिघडणार तयारी करा; कोटक महिंद्राच्या संस्थापकांनी दिला धोक्याचा इशारा
या प्रकरणात पोलिसांनी नाशिकमधील एका आरोपीला ताब्यात घेतले होते. त्याच्या चौकशीत त्याला मदत करणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील साथीदाराचे नाव धनंजय लोखंडे असल्याचे समोर आले होते. धनंजय हा पुणे जिल्ह्यात काम करत असला तरी त्याचे मूळ गाव अहिल्यानगर जिल्ह्यातील आहे. तो पसार झाला होता.
उन्हाळ्यामुळे पीरियड्स सायकल बिघडलंय? जाणून घ्या कारणं अन् उपाय
त्याला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आज (ता. 13) अहिल्यानगर जिल्ह्यातून ताब्यात घेतल्याचे समजते. धनंजय लोखंडे हा राहुरी तालुक्यातील रहिवासी असल्याचे समजते. सीबीआयचे पथक आज पहाटे अहिल्यानगर शहरात दाखल झाले. त्यांनी धनंजय लोखंडेचा तपास करत त्याला ताब्यात घेतले. त्याला पुढील तपासासाठी पुण्यात नेण्यात आल्याची माहिती विश्वसनिय सूत्रांकडून समजते. तो पुण्यामध्ये कामाला होता. मात्र त्याचं मुळ गाव हे अहिल्यानगरचं असल्याने त्याला तेथून ताब्यात घेण्यात आलं आहे.
या पेपरफुटीचा उगम आणि प्रसार नाशिकमधून सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात 30 वर्षीय शुभम खैरनार या संशयित आरोपीला इंदिरानगर भागातून त्याला अटक करण्यात आली आहे. ताब्यात घेण्यात आलं आहे. खैरनार मूळचा नाशिकचा असून तो भोपाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेत असल्याचे सांगितले जात आहे.
मोठी बातमी! बारामतीत पुन्हा विमान अपघात; अजितदादांच्या अपघात झालेल्या गावातच कोसळलं
नाशिकमधील लीक प्रश्नपत्रिका हरियाणात पोहोचली, येथे फुटलेल्या पेपरचे 10 सेट तयार करण्यात आले. त्यानंतर, हरियाणातून बिहार, आंध्र प्रदेश, जम्मू आणि काश्मीरपर्यंत नीटची प्रश्नपत्रिका सहजपणे पोहोचली. आत्तापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार जयपूरमधून अटक करण्यात आलेला मनीष हाच पेपरफुटीचा मास्टरमाईंड असल्याचे दिसून येत असून, मनिषने प्रश्नपत्रिका प्रिंट होण्यापूर्वीच पेपरमधी संभावित प्रश्न माहिती करुन घेतले होते. मनिषने प्रश्नपत्रिका प्रिंट होण्यापूर्वीच पेपरमधी संभावित प्रश्न माहिती करुन घेतले होते असे सांगितले जात आहे.
42 तास आधीच पेपर लीक
3 मे रोजी जेव्हा प्रामाणिक विद्यार्थी परीक्षा केंद्रावर घाम गाळत होते, तेव्हा काही ‘बाजारू’ प्रवृत्तींनी तुमच्या भविष्याचा सौदा आधीच केला होता. 1 मे रोजी सकाळीच प्रश्नपत्रिका टेलिग्राम आणि व्हॉट्सॲपवर फिरत होती. गुन्हेगारांनी याला ‘गेस पेपर’ असे नाव देऊन त्याची विक्री सुरू केली होती. धक्कादायक म्हणजे केरळमधील एका नामांकित मेडिकल कॉलेजच्या MBBS विद्यार्थ्याने 1 मे रोजी हा पेपर लीक केला आणि तो राजस्थानच्या ‘सीकर’ मधील कोचिंग हबपर्यंत पोहोचवला असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
कपडे बदलले अन् संपूर्ण केस काढलेले होते
खैरनारबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, ‘देशभरातून एकूण 16 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यातील नाशिकमधून शुभम खैरनार या संशयिताला ताब्यात घेतलं आहे. राजस्थान पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं, त्यानुसार आम्ही त्याला ताब्यात घेतलं आहे. ‘आम्हाला नाव मिळालं होतं पण पत्ता आणि अधिक माहिती नव्हती. काही प्रमाणात तांत्रिक माहिती मिळवली आणि आम्ही शोध सुरु केला. त्याने त्याचे कपडे बदलले होते, संपूर्ण केस काढून टाकले होते. शुभम देवाच्या दर्शनासाठी जात असताना रस्त्यात सापळा रचून त्याला ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितलं. राजस्थान पोलिसांच्या म्हणण्यानुसार नाशिकमधून नीटचा पेपर व्हाया हरियाणातून राजस्थानमध्ये पोहोचला होता’, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
उद्या परीक्षेत हेच प्रश्न येतील पोरानं वडिलांना केला होता मेसेज
तर, तपासात केरळमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने 2 मे रोजीच सीकरमध्ये राहणाऱ्या आपल्या वडिलांना जे एक पीजी हॉस्टेल संचालक आहेत त्यांना मोबाईलवर ‘गेस पेपर’ पाठवला असल्याचे सांगितले जात आहे. सोबत एक मेसेजही केला होता, ज्यात त्याने स्पष्टपणे सांगितले होते की, “हा पेपर तुमच्या हॉस्टेलमधील मुलींना द्या, उद्या परीक्षेत हेच प्रश्न येतील!” 3 मे रोजी सकाळीच हा पेपर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला. या पीजी चालकाने एका नामांकित कोचिंग क्लासच्या शिक्षकाला हा पेपर दाखवून पडताळणी केली, तेव्हा सत्य समोर आले.
नीट परीक्षेतील बायोलॉजीचे सर्व 90 प्रश्न हे 2000 प्रश्नांच्या गेस पेपरमध्ये होते, तर केमिस्ट्रीचे सर्व 45 प्रश्न 81 प्रश्नांच्या गेस पेपरमध्ये जसेच्या तसे आढळले. विशेष म्हणजे, या प्रश्नांमधील स्वल्पविराम किंवा पूर्णविरामही बदललेला नव्हता, ज्यावरून ही केवळ अफवा नसून प्रिंटिंग प्रेस किंवा यंत्रणेतून झालेली थेट पेपरफुटी असल्याचे स्पष्ट झाले आहे.