देशात आर्थिक परिस्थिती आणखी बिघडणार तयारी करा; कोटक महिंद्राच्या संस्थापकांनी दिला धोक्याचा इशारा
Kotak Mahindra founder warns of danger यांनी भारतातील आर्थिक परिस्थिती लवकरच आणि मोठ्या प्रमाणावर बिघडू शकते, असा इशारा दिला आहे.
Prepare for economic situation in country to worsen Kotak Mahindra founder warns of danger : भारतातील आर्थिक परिस्थिती लवकरच आणि मोठ्या प्रमाणावर बिघडू शकते, असा इशारा देशातील प्रख्यात बँकर आणि कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक यांनी दिला आहे. त्यांनी मंगळवारी कोफेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री च्या वार्षिक बिझनेस समिटमध्ये याबाबत वक्तव्य केले आहे.
नेमकं काय म्हणाले उदय कोटक?
उदय कोटक यांचे हे वक्तव्य अशा वेळी समोर आले आहे, जेव्हा नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना सोने खरेदी टाळण्याचे, पेट्रोल-डिझेलवरील खर्च कमी करण्याचे आणि परदेश प्रवासावर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधानांच्या या वक्तव्यातून ज्या मोठ्या आर्थिक संकटाचा इशारा मिळत होता, त्याबद्दल उदय कोटक यांनी स्पष्टपणे चिंता व्यक्त केली.
उन्हाळ्यामुळे पीरियड्स सायकल बिघडलंय? जाणून घ्या कारणं अन् उपाय
उदय कोटक म्हणाले, “आपण अशी अपेक्षा ठेवली पाहिजे की संकटाचा काळ येऊ नये आणि परिस्थिती नियंत्रणात राहावी. मात्र, सर्वात वाईट परिस्थितीसाठीही आपल्याला स्वतःला तयार ठेवणे गरजेचे आहे. मुख्य मुद्दा तयारीचा आहे. संकट येण्याची वाट पाहण्यापेक्षा आधीच सज्ज राहणे अधिक योग्य ठरेल.
पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे इंधनांच्या दरांमध्ये वाढ झाली असली, तरी गेल्या दोन महिन्यांत त्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांवर फारसा दिसला नाही. पण आता हा परिणाम जाणवू लागणार असून तो गंभीर स्वरूपाचा असू शकतो. ग्राहकांनी अद्याप त्याची खरी झळ अनुभवलेली नाही. धोका जवळ येत आहे आणि तो अगदी दारात उभा आहे. यापासून बचावाचा एकच मार्ग म्हणजे अमेरिका-इराण युद्ध संपणे.
जग आता “नॉर्मल” राहणार नाही
कोटक यांच्या मते, अनेक लोकांना वाटतं की जेव्हा एखादं संकट येतं. जसं युद्ध, आर्थिक मंदी किंवा जागतिक तणाव तेव्हा काही काळानंतर सगळं पुन्हा पूर्वीसारखं “नॉर्मल” होईल. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती तशी राहिलेली नाही. जग खूप बदललं आहे आणि आता जुन्या स्थितीत परत जाण्याची अपेक्षा ठेवण्याऐवजी नव्या परिस्थितीनुसार स्वतःला बदलणं गरजेचं आहे. त्यांनी इशारा दिला की, जग हळूहळू 1945 पूर्वीच्या काळाकडे जात आहे. त्या काळात “ज्याची ताकद त्याचं राज्य” असा नियम चालायचा. म्हणजेच, शक्तिशाली देश किंवा गट आपली मर्जी लादू शकत होते. त्यामुळे बदलत्या जागतिक परिस्थितीत प्रत्येक देशाने अधिक सजग राहण्याची गरज आहे.
व्यवसाय अधिक मजबूत करावे लागतील
कोटक यांनी भारतातील उद्योग आणि व्यवसाय अधिक सक्षम करण्याचा सल्ला दिला. यासाठी त्यांनी अमेरिकेचे उदाहरण दिले. त्यांच्या मते, अमेरिकेची खरी ताकद फक्त सरकारमध्ये नाही, तर तेथील मोठ्या आणि प्रभावी व्यवसायांमध्ये आहे. अमेरिका अशा वस्तू आणि सेवा तयार करते, ज्या संपूर्ण जग विकत घेते आणि वापरते. भारतानेही केवळ सरकारवर अवलंबून न राहता आपल्या कंपन्या, उद्योग आणि व्यापार इतके सक्षम बनवले पाहिजेत की जगाचे लक्ष आपल्याकडे वळेल. मजबूत व्यवसाय आणि जागतिक दर्जाची उत्पादने तयार केल्यास भारताची अर्थव्यवस्था अधिक प्रभावी ठरू शकते.