PM मोदींच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; सर्व मंत्री आणि अधिकाऱ्यांचे परदेश दौरे रद्द

CM Devendra Fadnavis : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेत सर्व

CM Devendra Fadnavis

CM Devendra Fadnavis : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेत सर्व मंत्री आणि अधिकाऱ्यांचे अभ्यास, कामासाठीचे परदेश दौरे रद्द करण्याचे आदेश दिले आहे. मंजूर झालेले दौरेही रद्द करण्यात यावे असे आदेश देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी हैदराबाद येथे बोलताना देशातील नागरिकांना काटकरीचे आवाहन केले होते.  एक वर्षासाठी सोन्याची खरेदी करणे टाळावे, परदेश प्रवास पुढे ढकलावे आणि इंधनाचा वापर कमी करावा असं आवाहन देशातील नागरिकांना पंतप्रधान मोदींकडून करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या या आहवानानंतर आताा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी देखील मोठा निर्णय घेत पेट्रोल – डिझेलची बचत करण्यासाठी आपल्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी केली आहे.

तर आता राज्य सरकारमधील अधिकारी आणि मंत्र्यांना आदेश देत सर्व मंत्री आणि अधिकाऱ्यांचे अभ्यास, कामासाठीचे परदेश दौरे (Foreign Tours) रद्द केले आहे. याच बरोबर मुख्यमंत्री फडणवीस यांनी यापूर्वी मंजूर झालेले दौरेही रद्द करण्याचे आदेश सर्व अधिकारी आणि मंत्र्यांना दिले आहेत.

हैदराबाद येथे पंतप्रधान मोदी यांनी देशाला केलेली आवहनं

पुढील एका वर्षासाठी सोन्याची खरेदी टाळा

पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा

सार्वजनिक वाहतूक वापरा

वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या

खाद्यतेलाचा वापर कमी करा

स्वदेशी उत्पादनं वापरा

विदेशी प्रवास टाळा

नैसर्गिक शेतीचा अवलंब करा

एका वर्षासाठी सोन्याची खरेदी थांबवली, तर देशावर काय होणार परिणाम? समजून घ्या संपूर्ण गणित-

follow us