एका वर्षासाठी सोन्याची खरेदी थांबवली, तर देशावर काय होणार परिणाम? समजून घ्या संपूर्ण गणित
PM Narendra Modi : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका जाहीर सभेत बोलताना देशातील नागरिकांना तब्बल एका वर्षासाठी सोने खरेदी करणे टाळा
PM Narendra Modi : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका जाहीर सभेत बोलताना देशातील नागरिकांना तब्बल एका वर्षासाठी सोने खरेदी करणे टाळा, तसेच परदेश प्रवास करु नका आणि जिथे शक्य आहे तिथे वर्क फ्रॉर्म होम करा असं आवाहन केल्यानंतर सोमवारी भारतीय शेअर बाजारात याचे परिणाम दिसून आले आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करणारे अनेक गुंतवणूकदारांना मोठा नुकसान सहन करावा लागला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या या आवाहनानंतर विरोधक देखील पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहे. तर दुसरीकडे जर खरोखरच भारतीयांनी पुढील एका वर्षासाठी सोने खरेदी बंद केली तर याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर काय होणार हे समजून घ्या.
परकीय चलन गणित
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, भारताचा परकीय चलन साठा अंदाजे 691 अब्ज डॉलर्स इतका आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) अंदाजानुसार, भारताची ‘चालू खात्यातील तूट’ (Current Account Deficit – CAD) 2026 पर्यंत 84.5 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचू शकते. म्हणजेच आपण कमावत असलेल्या डॉलर्सपेक्षा खर्च मात्र कितीतरी जास्त करत आहोत. तर दुसरीकडे भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सोने खरेदीदार देश आहे.
आर्थिक वर्ष 2026 मध्ये, भारताने 72 अब्ज डॉलर्स (अंदाजे 6 लाख कोटी रुपये) किमतीचे सोने (Gold) आयात केले. या सर्व व्यवहारांचे पैसे डॉलर्समध्ये चुकते करण्यात आले आणि याच प्रक्रियेमुळे देशाचा परकीय चलन साठा (राष्ट्रीय खजिना) वेगाने रिकामा होत आहे.
100 डॉलर्सचे तेल
अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे, कच्च्या तेलाच्या किमती 100 डॉलर्स प्रति बॅरलचा टप्पा ओलांडून पुढे गेल्या आहेत. भारताच्या तेलाच्या एकूण गरजेपैकी 88 टक्के तेल आयात केले जाते. अशा संघर्षाच्या काळात, लोक ‘सुरक्षित गुंतवणूक’ (Safe-Investment) म्हणून सोने खरेदी करण्याकडे कल दर्शवतात. यामुळे सोन्याच्या किमती तर वाढतातच, शिवाय देशाचे आयात बिलही फुगते. रुपयावर येणारा ताण जेव्हा सोन्याचे आयातदार खुल्या बाजारातून डॉलर्स खरेदी करतात, तेव्हा डॉलर्सची मागणी वाढते. परिणामी भारतीय रुपयाचे अवमूल्यन होते (रुपया कमकुवत होतो).
पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांच्या आवाहनामागचा उद्देश हाच आहे की, आपण सोने खरेदी करणे टाळून ते डॉलर्स (Indian Economy) वाचवावेत. जेणेकरून, महागड्या कच्च्या तेलाच्या आयातीचे पैसे देण्यासाठी आवश्यक असलेले परकीय चलन आपल्याकडे उपलब्ध राहील.
May 12 Horoscope : चंद्र करणार राहूशी युती; ‘या’ राशींच्या लोकांना आज होणार बंपर फायदा
तज्ज्ञांच्या मते, जर भारतीयांनी केवळ एका वर्षासाठी सोने खरेदी टाळली तर 20 ते 25 अब्ज डॉलर्सची बचत होऊ शकते. तसेच जर सोने खरेदीत 50 टक्क्यांची कपात केल्यास 36 अब्ज डॉलर्सची बचत साध्य करता येईल. यामुळे रुपया अधिक बळकट होईल आणि महागाईला आटोक्यात आणण्यास मदत मिळेल. तर दुसरीकडे देशात महागाई नियंत्रणात आण्यासाठी केंद्र सरकार दुसरा मार्ग काढणार का? पुन्हा एकदा भारत इराणकडून तेल खरेदीचा निर्णय घेणार का? याकडे देखील संपूर्ण देशाचे आणि भारतीय शेअर बाजाराचे लक्ष लागून आहे.