सोन खरेदी करू नका, पेट्रोल डिझेल कमी वापरा, पंतप्रधान मोदींचं देशातील जनतेला आवाहन

युद्धामुळे संपूर्ण जगात पेट्रोल, डिझेल, गॅस आणि फर्टिलायजरचे दर खूप जास्त वाढले आहेत. हे दर गगनाला भिडले आहेत.

News Photo   2026 05 10T211055.409

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या जनतेला पुढचे एक वर्ष सोने (Gold) खरेदी करु नये असं आवाहन केलं आहे. पंतप्रधान हैदराबाद येथे सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी देशाच्या नागरिकांना उद्देशून महत्त्वाचं आवाहन केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून अमेरिका, इस्त्रायल आणि इराण युद्धामुळे जगात मोठं तेलसंकट ओढावलं आहे. युद्धामुळे वस्तूंच्या जागतिक पुरवठा साखळीवर मोठा परिणाम पडला आहे.

या तेलसंकटाचे धग भारतालाही बसत आहेत. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संकट काळात पुढचे एक वर्ष सोने खरेदी न करण्याचं आवाहन केलं आहे. तसेच पेट्रोल, डिझेलचा वापर कमी करण्याचं आवाहन केलं आहे. तसेच खाद्य तेलाचा देखील वापर कमी करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पेट्रोल-डिझेल दुसऱ्या देशातून मागवावे लागतात. युद्धामुळे संपूर्ण जगात पेट्रोल, डिझेल, गॅस आणि फर्टिलायजरचे दर खूप जास्त वाढले आहेत. हे दर गगनाला भिडले आहेत.

मोठी बातमी! पंतप्रधान मोदींची सुरक्षा भेदण्याचा डाव, बंगळुरुत कार्यक्रमाच्या बाजुला सापडली स्पोटकं

आजूबाजूच्या देशांमध्ये काय अवस्था आहे ते वृत्तापत्रांमध्ये येत असतं. भारत सरकार या युद्धाच्या गेल्या दोन महिन्यांपासून देशवासीयांना या संकटापासून वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. नागरिकांवर ओझं होऊ नये म्हणून सरकार संपूर्ण ओझं आपल्या खांद्यावर घेत आहे. पण जेव्हा पुरवठा साखळीवर संकट कायम राहील तर आपण कितीही उपाय केले तरी अडचणी वाढतच जातात. त्यामुळे आता देशाला प्रथम प्राधान्य ठेवून आपल्याला एकजूट होऊन लढावं लागेल.

आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की, देशासाठी मरणं फक्त देशभक्ती राहत नाही. देशासाठी जगावं आणि देशासाठी आपल्या जबाबदाऱ्या पार पाडणं यालादेखील देशभक्ती म्हणतात. त्यामुळे या जागतिक संकटात आपल्याला आपले कर्तव्य प्राधान्याने पार पाडायला हवेत. यासाठी काही संकल्प आपल्याला करावे लागतील. ते संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील असंही मोदी म्हणाले.

आपल्याला पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करावा लागेल. शहरात जिथे मेट्रो आहेत तिथे आपण केवळ मेट्रोने वापर करायचा निर्णय घ्यावा. कारमधून जाणं जरुरी असेल तर कार फूल करण्याचा प्रयत्न करा. इतर लोकांनाही सोबत बसवावं. आपल्याला कुठे सामान पाठवायचं असेल तर ते रेल्वेने पाठवण्याचे प्रयत्न करा. जेणेकरुन इलेक्ट्रिक रेल्वे असल्या कारणाने पेट्रोल-डिझेलची गरज भासत नाही. ज्या लोकांकडं इलेक्ट्रित गाड्या आहेत, त्यांनीदेखील प्रयत्न करावा की, त्यांचा जास्तीत जास्त वापर करावा असंही ते म्हणाले.

follow us