Download App

Chandrashekhar Bavankule : पवारांच्या हॉस्पिटलमध्ये ठाकरे बिघडले त्यामुळे… बावनकुळेंचा टोला

Chandrashekhar Bavankule : भाजप प्रदेशाध्य चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी उद्धव ठाकरे यांच्या कालच्या दसरा मेळाव्यातील भाषणावरून चांगलीच टोलेबाजी केल्याचं पाहायला मिळालं. ‘खरं तर उद्धव ठाकरे हे शरद पवारांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन बिघडले आहेत, त्यांना काही आठवत नाही.’ असा टोला त्यांनी लगावला आहे.

पवारांच्या हॉस्पिटलमध्ये ठाकरे बिघडले…

यावेळी बावनकुळे म्हणाले की, कालच्या दसरा मेळाव्यातील ठाकरेंचं रटाळ भाषण होते. देश मोदींना कुटुंब मानतोय. मोदींना परिवाराचा प्रमुख अशी भावना आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी काहीही म्हटलं तरी, इंडिया आघाडीत उद्धव ठाकरे गेले आहेत. त्यामुळे ते शरद पवार आणि काँग्रेसचे वकील आहेत.

देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीला यश! निलेश राणेंची नाराजी दूर; निवृत्तीचा निर्णय 24 तासात मागे

तसेच उदय स्टालिन यांच्या वक्तव्यावर खुलासा उद्धव ठाकरे यांनी केला नाही. स्टालिन यांच्यासोबत जाऊ हे पुन्हा रेटून सांगितले. विकासाचे मुद्दे उद्धव ठाकरेंकडे नाही. व्हिजन लेस व्यक्ती राजकारणात असताना जनतेला कन्फ्युज करत आहे. खरं तर उद्धव ठाकरे हे शरद पवारांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन बिघडले आहेत, त्यांना काही आठवत नाही. कालचे इंडिया आघाडीच्या प्रवक्त्यांचे भाषण होते. विकासाचे उद्धव ठाकरेंना काय कळत नाही. 2047 पर्यंत सर्वांनी वाट बघावी. बेईमानी करून मुख्यमंत्री पद मिळवले.

Pune News : ऐन सणासुदीच्या काळात पुणेकरांची सत्व परीक्षा; ओला-उबरसह स्वीगी झोमॅटोची सेवा आज बंद

तर यावेळी निलेश राणे यांच्यावर बोलताना ते म्हणाल की, यांनी जीवनात अशी घटना होते. जेव्हा काहीशी निराशा येते. मी स्वतः रत्नगिरीत जाऊन आलो, अस काही नाही आहे. निलेश राणे चांगला नेते आहेत.एकनाथ शिंदे यांच मनापासून अभिनंदन करतो. महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेकडून अभिनंदन करतो आणि आभारी मानतो. छत्रपती शिवरायांना साक्षी म्हणून मराठा समाजाला आरक्षण देण्याची पूर्ण जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. अभिमान आहे, मराठा समाजाने मुख्यमंत्री शिंदे यांचे अभिनंदन केले पाहिजे. एकनाथ शिंदेंसारखे जबाबदार नेते छत्रपतींच्या साक्षीने वचन देत आहेत तर जरांगे पाटलांनी थोडी वाट पाहावी.

जर महाराष्ट्रातील सर्व पक्ष आणि नेते आरक्षणाच्या बाजूने आहेत, एकमुखाने मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूने आहेत, तर मग गावबंदी करून काय फायदा? जरांगे पाटलांनी यावर विचार करावा. पंकजा मुंडे यांच्या रक्तात भाजप आहेत. त्यांच्या बोलण्यात काही वेगळे नाही. पक्ष योग्य निर्णय करेल. केंद्रीय नेतृत्व योग्य निर्णय करेल. त्या आमच्या नेत्या आहेत. भाजप त्यांच्या मागे उभा आहे.

Tags

follow us