Download App

मी म्हणतो का माझ्या काकांना जाणता राजा म्हणा? अजित पवारांचा सवाल

पुणे : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नागपूरमध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते असे सांगितले होते, त्यावर भाजपकडून जोरदार टीका करण्यात आली. विविध ठिकाणी निषेध करण्यात आला. त्यानंतर आज अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत त्यावर आपलं स्पष्टीकरण दिलं. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना परखड उत्तरं दिल्याचं पाहायला मिळालं.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जाणता राजा म्हणतात त्यावर भाजपकडून आक्षेप घेतला जातो. त्यावर अजित पवार यांनी सडेतोड उत्तर दिलं की, शरद पवार यांना जे लोक जाणता राजा म्हणतात त्यांना तुम्ही हे सांगा. मी लोकांना सांगत नाही की, माझ्या काकांना जाणता राजा म्हणा म्हणून. ज्यांनी तो शब्दप्रयोग वापरला त्यांना तुम्ही हा प्रश्न विचारा मी त्याबद्दल कसं सांगू असंही त्यांनी सांगितलं.

पवार म्हणाले की, स्वराज्यरक्षकामध्ये शौर्य, धर्मरक्षण, स्वराज्य निर्मिती, समाज या गोष्टी येतातचं त्या पहिल्यापासूनचं होत्या. आता या भाजपवाल्यांना सगळं फोडून सांगायचं का? असाही टोला यावेळी त्यांनी लगावला. त्यामुळं आम्ही त्याच्या विरोधात असण्याचं काहीच कारण नसल्याचं यावेळी सांगितलं. अशा पद्धतीनं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपली बाजू पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केली आहे.

Tags

follow us