Download App

मोठी बातमी : खंडाळा घाटात भीषण अग्नितांडव; चौघांचा होरपळून मृत्यू तर, तिघे जखमी

  • Written By: Last Updated:

पुणे :  पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरू एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील खंडाळा घाटात एका केमिकलच्या टँकरने पेट घेतला. यामुळे मुंबई आणि पुण्याकडे जाणाऱ्या दोन्ही मार्गावर गेल्या तासाभरापासून मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे.या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. या घटनेत चौघांचा होरपळून मृत्यू तर, तिघेजण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली असून, मृतांचा आकाडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.  (Chemical Tanker Catch Fire In Mumbai Pune Express Way)

सध्या या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. या भीषण अग्नितांडवामध्ये टँकर चालकाचा जागीच होरपळून मृत्यू झाला असून, क्लिनर जखमी झाला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक लता फड यांनी एका वृत्तावाहिनीला बोलताना दिली आहे. आगीचा एक लोळ पुलाच्या खाली पडल्याने एक महिला जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले असून, पुण्याकडे जाणारी वाहतूक धिम्यागतीने सुरू करण्यात आली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर लोणावळ्याजवळ ओव्हर ब्रीजवर ऑइल टँकरचा अपघात होऊन भीषण आग लागलीये. यामुळे ब्रीजखाली  असणाऱ्या गाड्यांचेदेखील नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. सध्या घटनास्थळी मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या महामार्गावरील वाहतूक सध्या लोणावळा शहरातून वळवण्यात आली आहे. आगीची भीषणता एवढी होती की, यात चार जण दगावले असून, यात तीन जणांचा मृत्यू तर तिघेजण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून ट्विट

दुसरीकडे, या भीषण अपघातानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले आहे. मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या एका अपघातात 4 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या घटनेत 3 जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना लवकर आराम पडावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. राज्य पोलिस दल, महामार्ग पोलिस, आयएनएस शिवाजी, अग्निशमन दल अशा सर्व यंत्रणा घटनास्थळी असून आता आग आटोक्यात आली आहे. एका बाजूने वाहतूक पूर्ववत करण्यात आली असून, दुसराही मार्ग लवकरच सुरू होईल. राज्य सरकार स्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून असल्याचे फडणवीसांनी म्हटले आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज