Download App

मराठी भाषेला ‘अभिजात भाषेचा’ दर्जा तातडीने द्यावा ; सभागृहात छगन भुजबळांची मागणी

  • Written By: Last Updated:

मुंबई : आज महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Maharashtra Budget Session) सुरुवात झाली असून सुरुवातीलाच राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी, ‘मराठी भाषेला (Marathi) अभिजात भाषेचा दर्जा द्याच’ अशी मागणी सभागृहात केली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात सांगितले की, आपण लवकरच माझ्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊ आणि ही मागणी करू. नक्कीच ते आपली ही विनंती मान्य करतील, असा विश्वास त्यांनी दर्शवला आहे.

या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी गेले १४ वर्ष आपण प्रयत्न करत आहोत, आणि यांच्यामध्ये ४ गोष्टी आहेत. साहित्याची सशोता, भाषेचं वय, ते पंधराशे ते २ हजार वर्षाचे पुरावे, भाषेची स्वत्रंता आणि भाषेचं मूळ रूप आणि अखेरूप यांचं नातं हे अभिजात भाषेचे निकष आहेत. आपली मराठी भाषा पूर्ण करते. यापूर्वी १८८५ सालामध्ये राजाराम शास्त्री भागवत या संशोधनाचा १८८५ साली काही निष्कर्ष काढले, त्याच विश्लेषण दुर्गा भागवत यांनी केलं, आणि त्यामध्ये म्हंटले आहे की, ही जुनी आमची महाराष्ट्र भाषा संस्कृतपेक्षाही ही आमची जाणू भाषा आहे.

मराठी संस्कृतीभव भाषा नाही, ती संस्कृतपेक्षाही जुनी आहे. नात्याने ती संस्कृतची मावशी आहे, १९२७ मध्ये ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी प्राचीन महाराष्ट्राचा इतिहास दोन खंडात लिहिला, मराठी भाषेचे वय अडीच हजारहुन जास्त असल्याचे दाखवून दिले आहे, पांगारकरांनी सुद्धा तेच दाखवून दिलं आहे, अडीच वर्षांपूर्वी गाथा, सप्तशीत, स्पतशतीचे हे त्यावेळेला हे पुरावे दिले आहेत, ज्ञानेश्वरापासून सर्व संतांनी तेच म्हंटल आहे. एकनाथ महाराजांनी तर असं म्हंटल आहे की, संस्कृती जे आहे, ते देव निर्मली, मराठी काय चोरांनी पसरवली, अशा प्रकारची टीका देखील त्यांनी केली.

मराठीसाठी मुख्यमंत्री करणार दिल्लीवारी; अभिजात दर्जासाठी मोदींना भेटणार

याबाबतीत जे आहे, या ठिकाणी जी समिती मांडण्यात आली, त्या समितीने ७ वर्षांपूर्वी हे सगळं जे आहे, भारत सरकारच्या दृष्टीस आणून दिले आहे, ते साहित्य अकादमीने देखील हे बरोबर असल्याचे त्यावेळी सांगितलं, तेथील मंत्र्यानी देखील सांगितलं की हे बरोबर आहे, त्यात भाषेचा दर्जा मराठी भाषेला दिला पाहिजे, असे असताना सुद्धा आतापर्यंत हे आपल्याला मिळू शकलं नाही, माझी आपल्याला विनंती आहे की, याबाबतीमध्ये कोणत्या पक्षाचा, सरकारी पक्ष, विरोधी पक्ष यांचा काहीच प्रश्न येत नाही. हा सर्वांचा प्रश्न आहे म्हणून आपण स्वतः या सभागृहातील नेते, मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते यांचं आपण जे आहे. याना घेऊन दिल्लीमध्ये जाऊन मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा आपण दिला पाहिजे, असे त्यांनी यावेळी सुनावलं आहे.

या संदर्भातील सर्व पुरावे आम्ही तुम्हाला दिले आहेत, ते अकादमीने मेनी देखील केले आहेत, म्हणून लवकरात लवकर हा निर्णय तुम्ही घ्यावात, म्हणून आपण त्यांना गळ घातली पाहिजे, आणि यासाठी सर्वानी पुढाकार घेतल्या शिवाय होणार नाही, दक्षिण भारतातल्या ७ भाषण जे आहे, त्यांना अभिजात भाषा दर्जा मिळाला. हे केवळ पैशासाठी मिळवत नाही, ५०० कोट रुपये मिळतात, त्यासाठी नाही तर ४५० विद्यापीठामध्ये मराठी शिकवली जाईल, एक मानसन्मानच प्रश्न आहे, आमची भाषा जुनी असून सुद्धा आपण आपलं काम करू शकलो नाही,

Tags

follow us