Download App

अजितदादा उपमुख्यमंत्री असले तरी मी सीएम, एकनाथ शिंदेंनी सांगितले निधी वाटपाचे सूत्र

Chief Minister Eknath Shinde : महाविकास आघाडीच्या काळात अजित पवार यांनी निधी दिला नाही असं म्हणत तुम्ही शिवसेना सोडली होती. आता त्यांच्यासोबत काम करावे लागणार आहे. यावर एकनाथ शिंदे म्हणाले की त्यावेळीचे तत्कालीन मुख्यमंत्री घरात बसून काम करत होते. अजित पवार यांनी त्यांच्या पक्षाचे काम केले. म्हणून आता मी मुख्यमंत्री आहे. त्यामुळे काळजी करु नका. विकास वेगाने पुढं घेऊन जाऊ, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तुमच्या सरकारचे काम पाहून काँग्रेसचे देखील काही आमदार तुमच्याकडे येऊ शकतात का? यावर मुख्यमंत्री म्हणाले की ‘आता फुल झाले आहे.’

अजित पवार आणि त्यांच्यासोबत आलेल्या आमदारांना मंत्रिमंडळात घेतल्याने शिंदे गटातील आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीचा सरकारमध्ये समावेश झाल्याने मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला असल्याचे बोलले जात आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की मंत्रिमंडळ विस्तार तातडीने होणार आहे. एक आठवड्यात होईल असे त्यांनी सांगितले.

‘त्या’ किटी पार्टीला पवारांचं अध्यक्षपद मान्य मात्र पटेल-तटकरेंवरील कारवाई नाही; आव्हाडांचा हल्लाबोल

काल अजित पवार आणि त्यांच्या आमदारांनी सरकारला समर्थन दिले. त्यांनी विकासाच्या मुद्द्यावरच समर्थन दिले. त्यांनीही म्हटले की या देशात नरेंद्र मोदींचे नेतृत्व आहे. देशात चांगले काम सुरु आहे. राज्यातही विकासाचे काम सुरु आहे. त्यामुळे त्यांनी विकासाला साथ दिलेली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

अजित पवारांचे शिंदेंच्या पावलावर पाऊल, पक्ष आणि चिन्हासाठी निवडणूक आयोगात जाण्याचे संकेत

गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतीर्थवर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांना वंदन केले. यावेळी गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुला काय मागितले असं विचारल्यावर मुख्यमंत्री म्हणाले ‘गुरुने न मागता सर्व दिलेले आहे. त्यांच्याच आशिर्वादने राज्याचा कारभार सुरु आहे. एक वर्षापूर्वी सरकार स्थापन केलं. बाळासाहेबांची जी भूमिका होती त्याच मार्गावर आम्ही चालतो आहेत, असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले की गुरुपौर्णिमेनिमित्त शिवतीर्थावर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांना वंदन केलं. टेंभीनाका येथे आनंद आश्रमात जाऊन आनंद दिघे यांचा आशिर्वाद घेतला. यावेळी अनेकांनी पक्षात प्रवेश घेतला.

Tags

follow us