Download App

सहकाऱ्यांचे हात धरले,अर्धा डोंगर चढला अन्…; CM शिंदेंनी सांगितला इर्शाळगडावरील ‘आँखो देखा हाल’

Irshalwadi Landslide : इर्शाळवाडीमध्ये दरड कोसळ्याने मोठी दुर्घटना घडली आहे. रात्री 11.35 ला याची माहिती मिळाली. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणेमार्फत तात्काळ बचाव कार्य सुरु झाले. अतिशय दुर्गम भाग होता, पाऊस होता, वादळ वारा होता, अशी परिस्थित रात्री 12.40 च्या सुमारास प्रत्यक्ष घटनास्थळी जावान पोहचले. मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या संपर्कात होतो. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी 7 वाजल्यापासून वॉर रुममधून काम सुरु केले होते. तत्काळ बचाव कार्य करण्यासाठी यशवंत ट्रेकर्स ह्या समाजिक संस्थेचे 25 स्वयंसेवक आणि 34 ग्रामस्थ यांच्या मदतीने बचाव कार्य सुरु केले. एनडीआरएफच्या 4 टीम, टीडीआरएफचे 80 जवान, स्थानिक बचाव पथकाच्या 5 टीम यांनी बचाव कार्यात मोलाची कामगिरी बजावली, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

आतापर्यंत 20 लोकांचा मृत्यू झाला आहे. आठ लोकं जखमी आहेत. 119 लोकांना वाचवण्यात यश आले आहे. मृत झालेल्या लोकांच्या परिवाराला पाच लाख रुपये शासनाकडून दिले आहेत. जखमींचा खर्च शासनाकडून केला जात आहे. काल रात्री बचावकार्य थांबवले होते. आज सकाळी पुन्हा काम सुरु झाले आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी, एसपी, आयजी, तहसीलदार, प्रांत अधिकारी तत्काळ घटनास्थळी पोहचले. त्यानंतर गिरीष महाजन, उदय सामंत आणि दादा भुसे रात्री 3 वाजता तिथं पोहचले होते. रस्ता नव्हता, सायकलही जात नाव्हती अशा डोंगराळ कपारीत हे गाव वसलेले होते. तिथं पोहचल्यानंतर सर्वात महत्वाचे काम म्हणजे मलब्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढणे होते. अशा परिस्थित काम करण्यासाठी मशिनरी लागतात पण तिथं कोणत्याही मशिनरीची व्यवस्था करण्यासारखे नव्हते. पन्नास-शंभर वर्षापासून ते लोक तिथं राहते होते. दरडप्रवण क्षेत्राची यादी असते पण हे गाव त्या यादीमध्ये देखील नव्हते, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Irshalwadi Landslide : 36 तासांची झुंज यशस्वी! मातीच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या महिलेसाठी जवान ठरले ‘देवदूत’…

सुरुवातीला माहिती मिळाली होती की बाजूचा इर्शाळगड त्या गावावर कोसळला आहे. परंतु अधिकारी तिथं पोहचल्यावर त्यांनी सांगितले की 17-18 घरांवर मलबा होता. इर्शाळगडाच्या पायथ्याशी सगळी व्यवस्था केली होती. पण घटनेच्या ठिकाणी मनुष्यबळकडून काम करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे मलबा हाटवण्यासाठी एनडीआरएफचे जास्तीत जास्त जवान पाहिजे होते. त्यानुसार काम सुरु झाले. सिडको अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर त्यांनी 700-800 लोक पाठवले होते, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Tags

follow us