Download App

दावोस दौऱ्यावरुन जुंपली; चित्रा वाघ सुप्रिया सुळेंना म्हणाल्या, ‘अडीच पैसा देण्याचीही दानत नाही…’

Davos Tours : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली दावोस दौऱ्याच्या (Davos Tours) शिष्टमंडळात 70 लोक जात आहेत. या दौऱ्यासाठी तब्बल 34 कोटी रुपये खर्च केले जात आहेत. ही जनतेच्या पैशांची खुलेआम लूट आहे, असे ट्वीट करत राष्ट्रावादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supria Sule) यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यांच्या टीकेला भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

चित्रा वाघ यांनी ट्वीट केल आहे की दावोस परिषदेच्या पहिल्याच दिवशी 70 हजार कोटींचे करार झाले. विदेशी गुंतवणूकदारांना महाराष्ट्राबद्दल निर्माण झालेले आकर्षण लक्षात परिषदेच्या समाप्तीपर्यंत हा आकडा आणखी वाढेल. विकासाप्रती कटिबद्ध असणाऱ्या आमच्या सरकारच्या कामगिरीचं हे फलित आहेत. तुमच्या वसुली सरकारने अशा जागतिक व्यासपीठांकडं गांभीर्याने लक्ष दिलं असतं तर राज्यात रोजगारांचा सुकाळ निर्माण झाला असता. पण, स्वत:च्या तिजोऱ्या भरण्यात मग्न असलेल्यांना जनतेकडं लक्ष द्यायला फुरसत होतीच कुठे..?

त्यांनी पुढं म्हटले की आता अंगणवाडी सेविकांबद्दल खोटा उमाळा दाखवताय..? तुमच्या अडीच वर्षांच्या सत्ताकाळात या सेविकांना अडीच पैसा देण्याचीही दानत दाखवली नाहीत. मार्च 2023 मध्ये आमच्या महायुती सरकारने अंगणवाडी ताईंच्या मानधनात वाढीचा निर्णय घेतला आणि एप्रिलमध्ये ती लागूही केली. तुम्ही मात्र बोलाचा भात आणि बोलाची कढी करण्यापलीकडं काही करत नाही, असा टोला चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांना लागवला आहे.

पेपरफुटीविरोधातील आंदोलन दडपण्याचा सरकारचा डाव, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आक्रमक

दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट केले होते की दावोस दौऱ्यासाठी 70 जणांचे शिष्टमंडळ जात आहे. यामध्ये अधिकारी, पीए, ओएसडी, लहान मुले यांचा समावेश आहे. यासाठी तब्बल 34 कोटी रुपये खर्च केले जात आहेत. ही जनतेच्या पैशांची खुलेआम लूट आहे. एकीकडे अहोरात्र कष्ट करून सार्वजनिक आरोग्य व्यवस्था तोलून धरणाऱ्या अंगणवाडी भगिनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करीत आहेत. पण सरकार त्यांच्याकडे लक्ष देण्यास तयार नाही. तर दुसरीकडे मात्र करोडो रुपये सहलीसाठी उधळले जात आहेत. हि मोठी गंभीर बाब आहे. या उधळपट्टीचा निषेध. शासनाने आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवून पैशांचा योग्य विनियोग कसा होईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

‘नसती केली सुरत-गुवाहाटी तर कशाला झाली असती दाटीवाटी’; अंधारेंचा खोचक टोला…

follow us

वेब स्टोरीज