Cm Eknath Shinde: पावसाळ्याच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत पाहणी करून नालेसफाई, रस्त्याच्या कामांबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाणे येथील रस्त्यांची कामांची पाहणी केली. रस्त्यावर खड्डे पडल्यास महापालिकेचे अधिकारी व कंत्राटदारावर थेट कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तर रस्त्याची कामे करणाऱ्या एका कंत्राटदाराला तात्काळ कारणे दाखवा नोटीसही बजाविण्यात आली आहे.
ठाणे शहरातील रस्त्यांच्या कामांची पाहणी करत असताना टिकूजीनी वाडी सर्कल येथे सुरू असलेल्या रस्ताच्या डांबरीकरण कामाची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. यावेळी या कंत्राटदाराने कामगारांना कोणतीही सुरक्षा साधने, हॅन्ड ग्लोव्हज, हॅल्मेट इत्यादी साहित्य दिलेले नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून ओळख असलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांनी याची तातडीने दखल घेऊन कंत्राटदारावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.
Jayant Patil ED Enquiry : सर्व प्रश्नांची उत्तरे दिली, आता प्रश्नच शिल्लक नसतील, जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया…
रस्त्यांची कामे होणे हे जितके महत्वाचे आहे. तेवढेच ते बनवणारे कामगार सुरक्षित राहणे महत्वाचे असल्याचे त्यांनी या कंत्राटदाराला तात्काळ ही सामुग्री देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी खडसावले. तसेच त्यांच्यावर याबाबत कारवाई करण्याचे निर्देशही पालिका आयुक्तांना दिले आहे. तर ठाण्यामध्ये नवीन रस्त्यांना एक खड्डा पडल्यास कंत्राटदाराला एक लाखांचा दंड केला जाणार आहे. निविदेमध्ये तशी अटच घालण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
…तर नाना पटोलेंनी लादेनची भेट घेतली, फडणवीसांचे प्रत्युत्तर
रस्त्यांचा तुकडा काढून घेतला गेला. हा तुकडा आयआयटी मुंबई मध्ये तपासला जणार आहे. कोणत्याही रस्त्यांचे काम करताना विशिष्ट मातीचा थर त्यावर खडी आणि नंतर त्यावर डांबराचे थर चढवले जातात, त्यांत योग्य गोष्टींचा वापर केल्यास जेवढा जाड थर जमतो तेवढा जमला आहे का हे मोजपट्टीच्या सहाय्याने लगेच कळते मात्र तो बनवण्यासाठी वापरलेल्या वस्तू दर्जेदार आहेत अथवा नाही याची तपासणी करण्यासाठी तो प्रयोगशाळेत न्यावा लागतो. तिथे तपासणी केल्यानंतरच रस्त्यांचा दर्जा चांगला आहे अथवा वाईट याबाबत अंतिम अहवाल महानगरपालिकेला प्राप्त होणार आहे.
विशेष म्हणजे यंदा पहिल्यांदाच रस्त्यांचे असे मूल्यमापन होणार आहे. त्यातून रस्त्यांचा खरा दर्जा लोकांना कळू शकणार आहे.आज घेतलेले नमुने हे डांबर आणि काँक्रीट आशा दोन्ही रस्त्यांचे घेण्यात आले असून ते आयआयटी मुंबईच्या प्रयोगशाळेत पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. अशाप्रकारे करण्यात आलेला हा पहिलाच प्रयोग असून मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्यासाठी पुढाकार घेतल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.
https://www.youtube.com/watch?v=SgTY-R__OXM