मिसिंग लिंकचं लोकार्पण! फडणवीसांकडून एक्सप्रेस वेवरील प्रवाशांची माफी अन् व्हिडीओ शेअर करणाऱ्या सुळेंना टोला

CM Fadanvis यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या नागरिकांची माफी देखील मागितली.

CM Fadanvis

CM Fadanvis

CM Fadanvis Fadnavis apologizes to passengers on the expressway and criticize Sule for sharing video : राज्यामध्ये आज मुंबई पुणे मार्गावरील मिसिंग लिंक या बहुचर्चित प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा त्याचवेळी त्यांनी मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या नागरिकांची माफी देखील मागितली.

मुंबई-पुणे महामार्गावर मिसिंग लिंक खुली, आधी ब्रेक, आता एक्सेलेटर, मुख्यमंत्र्यांची जोरदार फटकेबाजी

त्यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, आजचा दिवस अतिशय आनंदाचा आहे, जे स्वप्न मुंबई पुणे प्रवास करणाऱ्यांनी बघितलं ते पूर्ण झाले. सध्या या प्रकल्पाला मिसिंग म्हटले जाते पण यांने तर कनेक्ट होत आहे. याला नाव जे द्यायचे आहे ते अद्याप ठरलेले नाही. मात्र या प्रकल्पाचं मिसिंग लिंक हे नाव बदला. कारण नथिंग इज मिसिंग असं म्हणत फडणवीसांनी या प्रकल्पाला कनेक्टिंग असं नाव दिलं.

मिसिंक लिंक उद्धाटन अन् एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी! प्रवासी संतापले, शिंदेंचे अधिकाऱ्यांना टोल न घेण्याचे निर्देश

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, आज मुंबई-पुणे एक्सप्रेसवर ट्रॅफिक जाम झालं होतं. त्यामध्ये अनेक जण अडकले त्रास त्यांना सहन करावा लागला यासाठी मी त्यांची माफी मागतो. तसेच यामध्ये सुप्रिया सुळे यांनी देखील ट्राफिकमध्ये अडकल्याचा व्हिडिओ टाकला होता. तर सुप्रिया ताई आज तुम्ही शेवटचे ट्रॅफिकमध्ये अडकला आहात. आता तुम्ही कधीच पुण्याला जाताना ट्राफिकमध्ये अडकणार नाही. तुमच्या सरकारने जे काम थांबवले होते. ते काम आमच्या सरकारने पूर्ण केलं असं म्हणत फडणवीसांनी सुप्रिया सुळेंना टोलाही लगावला.

Exit mobile version