‘SIR आंदोलन म्हणजे विरोधकांची नौटंकी’ राधाकृष्ण विखे पाटलांचा विरोधकांना टोला!

Radhakrishna Vikhe Patil On SIR; राधाकृष्ण विखे पाटीलांनी SIRच्या आंदोलनाला ‘नौटंकी’ म्हणत विरोधकांना कायदा, संविधान मान्य नसल्याचा आरोप केला.

Radhakrishna Vikhe Patil On SIR

Radhakrishna Vikhe Patil On SIR: अहिल्यानगर: SIR मोहिमेवरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवरती निशाणा साधला जात असून आंदोलन, मोर्चे करत निदर्शनेदेखील केले जात आहे. यावरती बोलताना राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे (Vikhe Patil) म्हणाले, SIR बाबतचे आंदोलन म्हणजे विरोधकांची केवळ नौटंकी आहे. या विरोधकांना देशाचे कायदे मान्य नाही, तसेच देशाची घटना मान्य नाही, केवळ अराजगता माजवण्याचा हा प्रकार आहे. अशा शब्दात मंत्री विखे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.

दुष्काळामुळे जिल्हा बँक बिनविरोधसाठी प्रयत्न मात्र त्यातही राजकारण… विखेंची खंत

तसेच पुढे बोलताना मंत्री विखे म्हणाले की, राहुल गांधी विदेशात जाऊन आपल्या देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करतात. निवडणुकीमध्ये यश मिळत नाही, याचं खापर SIR वरती फोडायचे. ज्या पक्षांना जनाधार राहिला नाही, त्याच पक्षांचा अराजकता माजवण्याचा हा प्रकार आहे. दरम्यान या प्रकरणावरून सुप्रीम कोर्टाने देखील विरोधकांना फटकारले आहे. ज्यांना कायदाच मान्य नाही, त्यांच्या या नौटंकी सुरू असून देशातील जनता या गोष्टीला भीक घालणार नाही, अशा टोला देखील मंत्री विखे यांनी लगावला.

जिल्हा सहकारी बँक निवडणुकीमध्ये काही जागा या बिनविरोध होत आहेत. तर काही ठिकाणी निवडणुका या होत आहे. मात्र हा सहकाराचा विषय असून यामध्ये राजकारण केले जाऊ नये, असं मत यावेळी मंत्री विखे यांनी व्यक्त केलं.

राज्यात पावसाचा जोर ओसरला, ऑक्टोबर हिटमुळे नागरिक हैराण, काही जिल्ह्यांत हलक्या सरींची शक्यता

पुणे येथे ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवरती निशाणा साधला जात आहे. यावरती देखील बोलताना विखे म्हणाले की, विरोधकांकडे काही कामच शिल्लक नाही. स्वतःच्या अस्तित्वाची धडपड या आंदोलनाच्या माध्यमातून सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री हे संवेदनशील आहे. या प्रकरणांमध्ये संपूर्णपणे पारदर्शकता असून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची भूमिका सरकारची आहे. मात्र कोणत्या प्रश्नावर ते राजकारण करत आहेत, असा सवाल देखील विखेंनी केला. तसेच या निवडणुकीमध्ये मंत्री थोरात व विखे एकत्र आले. या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, सहकारात राजकारण केलं जात नाही. राजकारणाचे जोडे बाजूला ठेवूनच सहकारी चळवळीची वाटचाल झाली पाहिजे, असं विखे पाटील म्हणाले.

‘पुणे बंद’च्या हाकेवर महापौर मंजुषा नागपुरेंचा विद्यार्थ्यांना सल्ला; ‘राजकीय हस्तक्षेपापासून दूर राहा’

तसेच एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना आवाहन करताना विखे म्हणाले, तुमच्या प्रश्नाचं राजकारण विरोधकांना करायचा आहे. तुमचा प्रश्न त्यांना सोडवायचा नाही. त्यांच्या अपप्रचाराला बळी पडू नका. राज्याचे नेतृत्व हे सक्षम असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांना न्याय मिळणार. अशा शब्दात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधकांना शाब्दिक टोला लगावला.

follow us