राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन खात्याचे (Zirwal) मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कथित व्हिडिओने समाज माध्यमांवर उलट-सुलट चर्चा आहे. एका ट्रान्सवुमनसोबत त्यांचे चित्रिकरण करण्यात आल्याचं दिसते. पवन यादवचा भाऊ रवी यादव यानेच हे प्रकरण समोर आणल्याने राष्ट्रवादी पक्ष पुन्हा अडचणीत सापडला. तर मंत्री नरहर झिरवळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून संपर्क साधून एक मोठा खुलासा केला आहे.
झिरवळ यांच्या कथित व्हिडिओप्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. नरहरी झिरवळ यांनी मला फोनवरून माझ्याशी संपर्क साधला. त्यांनी मला सांगितलं आहे की, हा जो व्हिडिओ आहे तो 3-4 व्हिडिओ जोडून चुकीच्या पद्धतीने तयार केलेला व्हिडिओ आहे. याची चौकशी व्हायला पाहिजे. मी त्यांना सल्ला दिला की तुम्ही तात्काळ तक्रार दाखल करा. या व्हिडिओची शहानिशा करण्यात येईल. त्याची सत्यता पाहण्यात येईल. त्यानंतर झिरवळ यांच्या राजीनाम्याबाबत त्यांच्या पक्षाच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मी योग्य निर्णय घेऊ असं त्यांनी स्पष्ट केलं.
भोंदू खरातबाबाने कोणत्या दोन नेत्यांचे बळी घेतले?, पाहा भाजप नेते काकडेंची मुलाखत
मुख्यमंत्र्यांनी अशी भूमिका घेतल्याने झिरवळांच्या राजीनाम्याबाबतचा सस्पेन्स उरला नसल्याचे समोर येत आहे. त्यांचा राजीनामा घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट झालं आहे. दरम्यान, भोंदूबाबा अशोक खरात याच्याप्रकरणात मुख्यमंत्र्यांनी मोठी अपडेट दिली. पहिल्यांदा त्यांचे फोटो व्हीडिओ येतात, यावरुन गोष्टी डिटरमिन करता येणार नाही.सहभाग असेल तर कारवाई होईल.
कोणालाच सोडण्याचे कारण नाही, येत्या काळात आणखी कारवाई होण्याची शक्यता आहे. आर्थिक फसवणूक झाली म्हणून लोकं पुढे येत आहेत. ह्या प्रकरणात दुर्दैवी महिला व्हीक्टिम आहेत, त्यांचे व्हीडिओ सोशल मीडिया साईटवर टाकले आहेत. अपलोड केले असतील व्हीडिओ तर कारवाई होईल. गोपनीयता यातील भंग करण्यात येत आहेत, त्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.
