Download App

Lok Sabha Election: मुंबई उत्तरमध्ये काँग्रेसची उमेदवारी जाहीर! पीयूष गोयलांना भूषण पाटील देणार टक्कर

आज काँग्रेसने देशातील चार लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली. यामध्ये उत्तर मुंबईमधून भूषण पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

  • Written By: Last Updated:
Image Credit: letsupp

Congress Candidate List Announced : लोकसभा निवडणुकीचे दोन टप्प्यातील मतदान पार पडले असून तिसरा टप्पा आता 7 मे रोजी होत आहे. आज काँग्रेसने देशातील चार लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये महाराष्ट्रात उत्तर मुंबईमधून भूषण पाटील (Bhushan Patil) यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे पीयूष गोयल आणि काँग्रेसचे भूषण पाटील यांच्यामध्ये सामना रंगणार आहे.

 

गोयल आणि पाटील अशी लढत

काँग्रेसने याचबरोबर हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. येथे भाजपकडून पीयूष गोयल यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता भूषण पाटील आणि पीयूष गोयल अशी ही लढत होणार आहे. सात मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. दरम्यान, महायुतीचे काही मतदारसंघातील उमेदवार अद्याप घोषित झाले नाहीत.

 

येथे हे आहेत उमेदवार

याचबरोबर हरियाणामधील गुडगावमध्ये राज बाबर, हिमाचल प्रदेशच्या कांगडा लोकसभेसाठी आनंद शर्मा, हिमाचल प्रदेशात हमीरपुरमधील सतपाल रायजादा आणि महाराष्ट्रात उत्तर मुंबईमधून भूषण पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान, आता सर्वत्र जोरदार प्रचार सुरू असून सर्वच पक्षाचे नेते एकमेकांवर जोरदार हल्ला करत आहेत.

follow us

वेब स्टोरीज