Lalit Patil Drugs Case : ललित पाटीलच्या भावाला वाराणसीतून अटक; पुणे पोलिसांना मोठं यश

Lalit Patil Drugs Case : ललित पाटीलच्या भावाला वाराणसीतून अटक; पुणे पोलिसांना मोठं यश

Lalit Patil Drugs Case : पुण्यातील (Pune)ससून रुग्णालयात (Sassoon Hospital)ड्रग्ज तस्करीचं रॅकेट(Drug smuggling racket) उघडकीस आलं. या रॅकेटमधील फरार ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा (Lalit Patil)भाऊ भूषण पाटील (Bhushan Patil)पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच अमली पदार्थ जप्त केले. त्यावेळी तब्बल दोन कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. 1 त्यावेळी जवळपास एक किलो 75 ग्रॅमचे मेफिड्रोन नावाचे ड्रग्ज होते. हे रॅकेट उघड झाल्यावर ससूनमधून पोलिसांना गुंगारा देऊन ललित पाटील फरार झाला. आता यामध्ये मोठं यश आलं आहे. ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटीलच्या मुसक्या आवळण्यात पुणे पोलिसांना यश आलं आहे.

Hema Upadhyay Murder Case : पती चिंतन उपाध्यायसह अन्य तिघांना जन्मठेपेची शिक्षा!

ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील याला उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथून पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळं आता लवकरच ललित पाटील पोलिसांच्या हाती लागेल, अशी शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.

लेक लाडकी योजना, औरंगाबाद विद्यापीठाचं नामकरण: मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

काही दिवसांपासून मुंबई, पुण्यासह नाशिकचे पोलिसही ललित आणि भूषण पाटील या दोघांच्या मागावर होते. साकीनाका पोलिसांनी 300 कोटींचे ड्रग्ज जप्त केले. त्या प्रकरणामध्ये भूषण आणि ललित हे दोघेही आरोपी होते. ललित अन् भूषण हे दोघेही एमडी ड्रग्ज बनवत होते. आता उत्तर प्रदेशमधील वारानसीतून भूषण पाटीलला अटक केली आहे. भूषणचा ड्रग्ज बनवण्याचा कारखाना होता.

ललित हा पुण्यातील ससून रुग्णालयातून फरार झाला. त्यानंतर ललित पाटीलचे नाशिक कनेक्शन समोर आले होते. नाशिकमध्ये ललित आणि त्याचा भाऊ भूषण पाटीलने ड्रग्ज कारखाना उभा केला. नुकताच त्या कारखान्यावर मुंबई पोलिसांनी छापा टाकला. असं असलं तरी नाशिकमधील पोलिसांना याची काहीच माहिती नव्हती, त्यामुळे याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे.

नाशिकमध्ये शिंदे एमआयडीसी परिसरातून काही दिवसांपूर्वीच 300 कोटींहून अधिक ड्रग्ज साठा जप्त करण्यात आला आहे. नाशिक पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यामध्ये ड्रग्ज बनवण्याचे साहित्य आणि ड्रग्ज जप्त केले आहे. शिंदे एमआयडीसीत शेती साहित्य ठेवण्यासाठी गाळा भाड्याने घेतला होता. मात्र ह्या गाळ्यात ड्रग्ज बनवण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकत ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे.

शिंदे गावात सुरु असलेला ड्रग्जचा कारखाना एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरु होता. पोलिसांनी शेडचा पत्रा कापून ड्रग्जच्या कारखान्यात प्रवेश केला होता. त्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला होता. मोठ्या प्रमाणात ड्रग्ज बनवण्याचे साहित्य पोलिसांना आढळून आले होते. सर्व माल पोलिसांनी जप्त केला आहे.

दोनच दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी शिंदे एमआयडीसी परिसरामध्ये मोठी कारवाई केली होती. त्यानंतर नाशिक पोलिसांकडून पुन्हा एकदा त्याच भागामध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिक शहर ड्रग्जच्या विळख्यात तर सापडलं नाही असा सवाल आता उपस्थित केला जातो आहे. त्यामुळे नाशिकमध्ये सुरु असलेल्या या ड्रग्ज प्रकरणाचा पोलिसांकडून देखील तपास सुरु आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube