लेक लाडकी योजना, औरंगाबाद विद्यापीठाचं नामकरण: मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

लेक लाडकी योजना, औरंगाबाद विद्यापीठाचं नामकरण: मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Cabinet meeting : शिंदे-फडणवीस-पवार सरकारने मुलींच्या सक्षमीकरणासाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. मुलींसाठी लेक लाडकी योजना राबवली जाणार आहे. तसेच औरंगाबाद विद्यापीठाच्या नावात छत्रपती संभाजीनगर असा बदल करण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील पीक पाण्याचाही आढावा घेण्यात आला. या संदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाने ट्वीट करत माहिती दिली आहे.

आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यतेखाली झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव आणि विविध विभागाचे मंत्री, वरिष्ठ विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मंत्रिमंडळ बैठकीत सात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

मंत्रिमंडळनिर्णय खालीलप्रमाणे:
– राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना. मुलींना करणार लखपती.
– सार्वजनिक खासगी भागीदारीतून उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी धोरण. मोठ्या प्रमाणावर खासगी गुंतवणूक जलविद्युतमध्ये येणार.
– सांगली, अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालये
– पात्र माजी खंडकरी शेतकऱ्यांना 1 एकरापेक्षा कमी जमीन मिळणार.
– फलटण ते पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग आता रेल्वे मंत्रालयातर्फे पूर्ण करणार
– भोसला मिलिटरी स्कूलला नागपूर येथे जमीन
– विद्यापीठाच्या नावात औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर बदल करण्यास मान्यता

लेक लाडकी योजनेत कोण पात्र ठरणार?
मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन त्यांचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे आणि मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे.

1 एप्रिल 2023 नंतर कुटुंबात जन्मणाऱ्या 1 अथवा 2 मुलींना त्याच प्रमाणे 1 मुलगा व 1 मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळेल. दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास 1 मुलगा किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल.

मात्र आई किंवा वडिलांनी कुटूंबनियोजन शस्त्रक्रीया करणे आवश्यक राहील. 1 एप्रिल 2023 पूर्वी 1 मुलगी किंवा मुलगा आणि आणि त्यानंतर दुसरी मुलगी किंवा जुळ्या मुली जन्माला आल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळेल. जुळ्या दोन्ही मुलांना स्वतंत्र लाभ देण्यात येईल. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

विजय वडेट्टीवार कधी सत्तांतर करणार? आशिष देशमुखांनी सांगितली डेडलाईन

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube