विजय वडेट्टीवार कधी सत्तांतर करणार? आशिष देशमुखांनी सांगितली डेडलाईन
Aashish Deshmukh On Vijay Wadettivar : आत्तापर्यंत विरोधी पक्षनेत्यांनी सत्तांतर केलं आहे, त्यामुळे विजय वडेट्टीवारही(Vijay Wadettivar) लवकरच सत्तांतर करतील अधिवेशनापर्यंत धीर धरा, असा दावा भाजपचे नेते आशिष देशमुख(Aashish Deshmukh) यांनी केला आहे. काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी सुरु असून विरोधी पक्षातील नेत्यांवर सत्तांतराचा आरोप करण्यात येत आहे. त्यावरुन विजय वडेट्टीवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मात्र, अजूनही सत्ताधारी भाजपकडून आरोप सुरुच आहेत.
Assembly Elections : 5 राज्यांच्या निवडणुका मोदी सरकारला निरोप ठरणार; ठाकरे गटाचा जोरदार हल्ला
राज्यात सध्या आगामी निवडणुकांचे वेध लागले आहे. विरोधकांसह सत्ताधारी भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. अशातच सत्ताधारी विरोधकांचं मनोबल कमी करण्यासाठी विविध आरोप करीत असल्याचं पाहायला मिळत आहे. याआधीही भाजपचे आमदार नितेश राणे यांनी वडेट्टीवार यांच्यावर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा केला होता. मात्र, नितेश राणेंच्या दाव्यावरुन वडेट्टीवारांनी त्यांनी कडक शब्दांत सुनावले आहे. आता पुन्हा एकदा आशिष देशमुखांनी वडेट्टीवारांवर निशाणा साधला.
अधिवेशनापर्यंत धीर धरा :
राहुल गांधींबद्दल वडेट्टीवार पहिल्यांदाच खरं बोलले आहेत. त्यांना बोलताना येत नाही, त्यांच नेतृत्व चांगलं नाही त्यामुळेच त्यांच्या तोंडून निघालं आहे. विजय वडेट्टीवार हे विरोधी पक्षनेत्यांची परंपरा पाहुनच पुढचं पाऊल ठेवणार आहेत. आधी एकनाथ शिंद यांनी सत्तांतर केलं त्यानंतर अजित पवार यांनी सत्तांतर केलं थोडा धीर धरा त्यानंतरच समजेलच. नागपूरच्या अधिवेशनापर्यंत धीर धरा त्यानंतर विजय वडेट्टीवार सत्तांतर करणार असल्याचा दावा आशिष देशमुख यांनी केला आहे.
Third Eye Asian Film Festival च्या प्रवेशिका सुरू; सिने रसिकांसाठी ठरणार पर्वणी
काय म्हणाले होते राणे?
भाजपातील स्फोटावर बोलण्यापेक्षा येत्या हिवाळी अधिवेशनापर्यंत तुमच्या विजय वडेट्टीवार यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवा. विरोधी पक्षनेते हे हिवाळी अधिवेशनापर्यंत कदाचित मंत्री होतील अशी चर्चा आमच्या महायुती सरकारमध्ये सुरू असल्याचं राणे म्हणाले होते.
NCP Crisis : घड्याळ नक्की कुणाचं ? अजितदादा की काकांचं? आज दोन महत्वाच्या सुनावण्या
वडेट्टीवारांनी राणेंना सुनावलं?
नितेश राणे जसं स्वत:कडे पाहत आहेत, तसंच त्यांनी दुसऱ्यांकडे पाहु नये, मी काँग्रेसचा एकनिष्ठ शिपाई असून माझ्या हायकमांडने माझा प्रामाणिकपणा पाहुनच माझ्यावर विश्वास टाकला आहे, त्यामुळे नितेश राणे यांनी उठवू नये,अशा चॉकलेटला मी प्रतिसाद देणारा कार्यकर्ता नाही, या शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी नितेश राणेंना सुनावलं आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून भाजपच्या नेत्यांकडून विजय वडेट्टीवारांच्या भाजप प्रवेशावर चांगलाच जोर दिला जात असल्याचं दिसून येत आहे. अद्याप विजय वडेट्टीवार यांनी यावर आपलं म्हणणं मांडलं नसून वडेट्टीवार आशिष देशमुखांच्या दाव्यावर नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्वाचं ठरेल.