NCP Crisis : घड्याळ नक्की कुणाचं ? अजितदादा की काकांचं? आज दोन महत्वाच्या सुनावण्या
NCP Crisis : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP Crisis) पक्ष आणि चिन्हाचा वाद निवडणूक आयोगाच्या (Election Commission) कोर्टात आहे. आता या प्रकरणात आज निवडणूक आयोगात दुसरी महत्वाची सुनावणी होणार आहे. या सुनावणीत राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कुणाचे यावर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या या सुनावणीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे शरद पवार गटाने अजित पवार गटाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरही आजच सुनावणी होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील दोन्ही गटांसाठी आजचा दिवस महत्वाचा ठरणार आहे.
Dhananjay Munde : ‘फेटा बांधणार नाही, हार-तुरेही घेणार नाही’; मुंडेंच्या निर्धाराचं कारण काय?
याआधी 6 ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगात सुनावणी झाली होती. या सुनावणीत दोन्ही गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. शरद पवार हुकूमशाही पद्धतीने पक्ष चालवतात असा आरोप अजित पवार गटाच्या वकिलांनी केला होता. तर दुसरीकडे पक्षाचं चिन्ह गोठवण्यात येऊ नये अशी मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आली होती. आता या प्रकरणी आज दुसरी सुनावणी होणार आहेत. या सुनावणीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे.
राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कुणाचं हा प्रश्न अजून अनुत्तरीत असताना शरद पवार गटाने अजित पवार गटातील आमदारांना अपात्र करण्यासंदर्भात एक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. याचीही सुनावणी आजच होणार आहे. या प्रकरणात सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार की सुनावणी आणखी लांंबणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आजच्या दोन्ही सुनावण्या खूप महत्वाच्या आहेत.
धक्कादायक! नांदेड रुग्णालयात मृत्यूचं तांडव सुरूच; 24 तासात 6 नवजात बालकांसह 15 जण दगावले
अजित पवार (Ajit Pawar) यांनी जुलै महिन्यात राष्ट्रवादीतील मोठा गट सोबत घेत बंडखोरी केली. त्यानंतर ते शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यांच्यासह काही आमदारांना मंत्रिपदेही मिळाली. आता अजित पवार गटाबरोबर नेमके किती आमदार आहेत याचा अजून खुलासा झालेला नाही. तरी देखील या गटाने थेट पक्ष आणि चिन्हावरच दावा ठोकला. यासाठी त्यांनी थेट निवडणूक आयोगात धाव घेतली होती. याच प्रकरणात आज निवडणूक आयोगात पुढील सुनावणी होणार आहे. सुनावणी होऊन आयोग या प्रकरणात निर्णय देईल अशी शक्यता आहे. तसेच ही सुनावणी कदाचित पुढे लांबण्याचीही शक्यता नाकारता येत नाही असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.