Download App

सचिनच्या घराबाहेर काँग्रेसने लावले पोस्टर, ‘मूग गिळून गप्प का?’

Wrestlers Protest : मुंबईत माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कुस्तीपटूंना पाठिंबा न दिल्याबद्दल पोस्टर लावले. मात्र, नंतर पोलिसांनी हे पोस्टर हटवले. युवक काँग्रेसच्या सदस्या रंजिता विजय गोरे यांनी हे पोस्टर लावले होते.

पोस्टरमध्ये भारतरत्न पुरस्कार विजेता सचिन तेंडुलकरच्या ‘मौन’वर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. पोस्टरमध्ये तुम्ही क्रीडा विश्वातील ‘देव’ आहात, पण जेव्हा काही महिला खेळाडू लैंगिक छळाच्या विरोधात आवाज उठवतात तेव्हा तुमच्यातील माणुसकी दिसून येत नाही.

कुस्तीपटूंनी 23 एप्रिलनंतर जंतरमंतर येथे त्यांचे आंदोलन पुन्हा सुरू केले होते परंतु 28 मे रोजी नवीन संसद भवनाकडे कूच करताना त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. यानंतर दिल्ली पोलिसांनी आंदोलनस्थळावरून त्यांचे सामान हटवले आणि त्यांना परत येण्यापासून रोखले होते. कुस्तीपटूंनी मंगळवारी त्यांची पदके गंगा नदीत विसर्जित करण्याची घोषणा केली होती परंतु खाप पंचायत आणि शेतकरी नेत्यांच्या समजूतीनंतर खेळाडू परतले.

धोनीच्या नेतृत्वात ‘हा’ ठरला IPL 2023 मधील सर्वोत्तम प्लेइंग-11 संघ

23 एप्रिलपासून देशातील अनेक कुस्तीपटू ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी यासाठी जंतरमंतरवर आंदोलन करत होते. एका अल्पवयीन महिला कुस्तीपटूंसह सात महिला कुस्तीपटूंवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या अटकेसाठी कुस्तीपटूंचे आंदोलन सुरु होते.

Tags

follow us