Download App

अमित शहांपर्यंत गेलेला भाजप-शिवसेनेतील वाद; कारण ठरलेल्या ‘त्या’ पोलीस निरीक्षकांची अखेर बदली!

मुंबई : भाजप-शिवसेनेच्या वादातून मागील पाच महिन्यांपासून सक्तीच्या रजेवर असलेले मानपाडा पोलीस स्थानकाचे निरीक्षक शेखर बागडे (Shekhar Bagde) यांची अखेर बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता कल्याण येथील महात्मा फुले पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर बागडे यांची ठाणे येथे खंडणी विरोधी पथकात नियुक्ती करण्यात आली आहे. (Controversial Inspector Shekhar Bagde of Manpada Police Station has finally been transferred)

कल्याण लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजप-शिवसेनेत शेखर बागडे यांच्यामुळे मोठी दरी निर्माण झाली होती.  यामध्ये राष्ट्रवादी (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही बागडे यांची ऑडिओ क्लिप ट्वीट करून शिवसेना-भाजप यांच्या वादात उडी घेतली होती.

वाद काय होता?

भाजपचे डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष नंदू जोशी यांच्याविरोधात एका महिलेने मानपाडा पोलिस स्थानकात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरुन मानपाडा पोलिसांनी जोशी यांच्यावर गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. मात्र हा गुन्हा दाखल होताच भाजपच्या वतीने मानपाडा पोलिस ठाण्यावर भव्य मोर्चा काढत वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या बदलीची मागणी करण्यात आली.

Raj Thackeray : CM ठाण्याचे, लोकांचा आक्रोश त्यांना.. टोलदरवाढीवर राज ठाकरेंचा संताप

मात्र यात कोणतीही सखोल चौकशी न करता हा गुन्हा राजकीय दबावामुळे दाखल केला असल्याचा दावा भाजपने केला होता. तसंच पक्षातील नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे, असाही आरोप करण्यात आला. यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार बागडे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. मात्र बागडे यांची बदली होत नाही तोपर्यंत कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे आणि शिवसेनेचे कोणतेही काम करणार नाही, अशी भूमिका भाजपने घेतली होती. तसा ठरावचं एका बैठकीत मंजूर केला.

शिंदे सरकारच्या चड्डीची नाडी, दिल्लीकरांच्या हाती; राऊतांची पातळी घसरली 

यावर रवींद्र चव्हाण यांनीही कार्यर्त्यांच्या मताचा सन्मान राखण्याची भूमिका घेतली. यावरुन काही जण युतीत मिठाचा खडा टाकतं आहेत, असा आरोप करत श्रीकांत शिंदे यांनी राजीनामा देण्याची भूमिका घेतली होती. हा वाद सुरु असतानाच श्रीकांत शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट झाली. त्यानंतर भाजप आणि शिवसेनेत मनोमिलन झाले होते. मात्र अंतर्गत धुसफूस कायम होती. अखेर आता बागडे यांची बदली झाल्याने या वादाला पूर्णविराम मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us