Download App

नानासाहेब पेशव्यांना 8 ते 10 वर्षाच्या मुली लागायच्या; भालचंद्र नेमाडेंचे विधान

  • Written By: Last Updated:

Bhalchandra Nemade : गेल्या काही दिवसांपासून ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी इतिहासातील अनेक मुद्यांवर भाष्य केले आहे. त्यांच्या विधानांचे पडसाद देखील उमटले आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी पेशव्याच्या चालीरितीवर बोट ठेवले आहे. नेमाडे म्हणाले की पेशवे दृष्ट आणि नीच प्रवृतीचे होते. नानासाहेब पेशवे जिकडे जातील तिकडे 8 ते 10 वर्षाच्या मुलींची मागणी करत होते. त्या मुलींना मारुन टाकायचे की काय करायचे हे मी सांगणार नाही, असे विधान केले आहे. त्यांच्या या विधानमुळे वाद पेटण्याची शक्यता आहे.

मुंबईतील एका कार्यक्रमात नेमाडे म्हणाले की आपण जो इतिहास समजतो तो काही खरा नाही. यासाठी आपण खऱ्या पद्धतीने दुसऱ्या बाजीराव यांच्यावर लिहीले पाहिजे हे ठरवले. दुसरा बाजीराव हा खुप मोठा माणूस होता. दुसऱ्या बाजीरावांनी पेशव्याच्या तावडीतून महाराष्ट्राला वाचवले आणि इंग्रजांकडे सोपवले. कारण पेशवे इतके दृष्ट आणि नीच प्रवृतीचे होते.

ते पुढं म्हणाले पुस्तकं वाचल्याशिवाय आपल्याला काहीच बोलता येत नाही. आज जे काही चाललं आहे ते खोटं आहे. खरं काय आहे हे पुस्तकातून कळतं. त्यामुळे आपण वाचलं पाहिजे.

आजपासून माझ्यासाठी ईशा झा हा विषय संपला; हर्षवर्धन जाधवांचा मोठा निर्णय

नानासाहेब पेशवा हा कुठेही गेला तरी याचे एक पत्र पंजाबातील गोविंदपंत बुंधेले याला असायचं. मी इतक्या दिवशी अमुक ठिकाणी येतोय. 2 शुद्ध आणि सुंदर मुली 8 ते 10 वर्षाच्या तयार ठेवा, असं पत्र असयाचं. मी स्वत: गोविंदपंत बुंधेले लिहीलेली पत्र वाचले आहेत, असे नेमाडे म्हणाले.

Aditya Kadam: नाटकानंतर आदित्य कदम गाजवणार मोठा पडदा! थरारक भूमिकेतून दिसणार ‘या’ सिनेमात

आता हे नानासाहेब पेशवे 8 ते 10 वर्षाच्या मुलींच काय करायाचे? मारुन टाकायचा की काय हे माहिती नाही. पण चाळीस बेचाळीस वर्षाचा माणूस 8 ते 10 दहा वर्षांच्या मुलींना तयार ठेवायला सांगत होता. दर ठिकाणी असं पत्र असायचं. पेशव्याच्या तावडीतून आपण सुटलो हे फार बरं झालं हे मी बा.सी. बेंद्रे यांना एकदा म्हटलं होतं. यावर बेंद्रे फार संतापले. म्हणाले तुमची डोकी उलटी का चालतात?

पेशवे बदमाशी करत होते. त्या बदमाशी करणाऱ्या लोकांना धडा म्हणून इंग्रज आले होते. असं माझं लहानपणी मत होतं. पण आता थोडं बदललं आहे. इंग्रजही बदमाश होते पण पेशेव्यापेक्षा कमी होते, असे भालचंद्र नेमाडे म्हणाले.

Tags

follow us