आजपासून माझ्यासाठी ईशा झा हा विषय संपला; हर्षवर्धन जाधवांचा मोठा निर्णय
Harshvardhan Jadhav : नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येणारे माजी आमदार आणि बीआरएस पक्षाचे नेते हर्षवर्धन जाधव पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामुळे ते चर्चेत आले आहेत. यामध्ये त्यांनी आपली साथीदार ईशा झाबद्दल खळबळजनक खुलासा केला आहे.
Hemangi Kavi : हेमांगी कवीची पोस्ट चर्चेत; म्हणाली,“मासिक पाळी असताना देवळात…”
काय म्हणाले हर्षवर्धन जाधव?
जाधव म्हणाले कीा, ईशा झा यांना मी माझा साथीदार म्हणून घोषित केलं होत. मात्र सातत्याने आमचं यमक अजिबातच जुळत नाहीय असं जाणवलं. त्यामुळे आजपासून माझ्यासाठी ईशा झा हा विषय संपला असं जाहीर करतो. असं म्हणत माजी आमदार आणि बीआरएस पक्षाचे नेते हर्षवर्धन जाधव यांनी आपली साथीदार ईशा झासोबतच्या नात्याबद्दल मोठा निर्णय घेतला आहे.
आमचा पक्ष अन् परिवार व्यवस्थित, जयंत पाटलांबद्दल सांगायला मी मनकवडा नाही; अजितदादांची चौफेर फटकेबाजी
यावर पुढे बोलाताना जाधव म्हणाले की, एकदिवशी तर त्यांचा एक व्हिडीओ आला आणि महाराष्ट्रभर व्हायरल झाला. मला अत्यंत वाईट वाटले. माझी मनस्थिती खराब झाली. मीही काही ठिकाणी काही बडबड केली. पण मी स्वतःला सावरत हा गाडा सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू केला. तर माला जेव्हा हार्ट अॅटॅक आला जेव्हा माझं दिल्लीत कोणी नव्हतं. त्यामुळे मी त्यांच्या भावाला फोन केल. त्यांना ती चेष्ट वाटली. दिल्ली पोलिसांचा फोनही त्यांना खोटा वाटला.