Download App

Corona Cases : मुंबईत कोरोनाची झपाट्याने वाढ, 10 दिवसांत वाढले एवढे रूग्ण

मुंबई : देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या (Covid-19) रूग्णांमध्ये मोठी वाढ होताना दिसून येत आहे. मुंबईमध्ये तर वाढत्या रूग्णसंख्येमुळे आरोग्य मंत्रालयाची देखील चिंता वाढली आहे. त्यानंतर आता लोकांना मास्क लावणे आणि सोशल डिस्टन्सिंगच पालन करण्याचं अवाहन करण्यात येत आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याचा सल्ला देखील प्रशासनाकडून नागरिकांना देण्यात येत आहे. गेल्या 10 दिवसांत मुंबईत कोरोना रूग्णांच्या आकडेवारीत होत असेलेली वाढ पाहता मुंबईत कोरोनाची झपाट्याने वाढ होत असल्याचं दिसून येत आहे.

गेल्या 10 दिवसांत मुंबईत 100 पेक्षा अधिक कोरोनाचे रूग्ण समोर आले आहेत. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत 3 एप्रिलला 75 नवे रूग्ण आढळून आले आहेत. तर त्याअगोदर 2 एप्रिलला 172 नवे रूग्ण आढळून आले होते.

गेल्या 10 दिवसांताल मुंबईतील दररोजची रूग्णसंख्या
3 एप्रिल – 75 रूग्ण
2 एप्रिल – 172 रूग्ण
1 एप्रिल – 189 रूग्ण
31 मार्च – 177 रूग्ण
30 मार्च – 192 रूग्ण
29 मार्च – 139 रूग्ण
28 मार्च – 135 रूग्ण
27 मार्च – 66 रूग्ण
26 मार्च – 123 रूग्ण
25 मार्च – 105 रूग्ण

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या गेल्या चार महिन्यांमध्ये कमी झाली होती. पण गेल्या काही आठवड्यामध्ये कोरोना रुग्णांचा आलेख दिवसागणिक वाढत आसल्याचं चित्र आहे. वाढता संसर्ग लक्षात घेता नागरिकांनी मास्क वापरण्याचं आवाहन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केले आहे. सॅनिटायझरने हात स्वच्छ ठेवा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, असे अवाहन देखील आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.

दरम्यान आता मुंबई महानगर पालिकेने खबरदारी घ्यायला सुरूवात केली आहे. ज्या पद्धतीने महापालिकेने कोरोना काळात योग्य पद्धतीने नियोजन केलं होतं. त्याप्रमाणे पुन्हा एकदा नियोजन करायाला सुरूवात केली आहे. मुंबईत पुन्हा एकदा तीन जम्बो कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये सेव्हन हिल्स आणि कस्तुरबा रूग्णालय आणि इतर ठिकाणी हे जम्बो कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहेत.

Corona चा धोका वाढला ! सहा महिन्यांत देशात पहिल्यांदाच सापडले ‘इतके’ रुग्ण..

यामध्ये बेड्सची सुविधा,योग्य उपचार इतर सुविधा या जम्बो कोविड सेंटरमध्ये असणार आहेत. तर दुसरीकडे मुंबईत एच3 एन2 चा प्रभाव देखील मुंबईत वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे महापालिका ठिकठीकाणी बेडची संख्या महापालिकेकडून वाढवण्यात येत आहे. रूग्णालयांसह कोरोना नियंत्रण कक्षही पुन्ह सुरू करण्यात येणार आहे.

Tags

follow us