Corona Update : काही महिन्यांपासून नियंत्रणात असलेल्या कोरोना (Corona Update) आजाराचे रुग्ण राज्यात पुन्हा वाढायला सुरुवात झाली आहे. मंगळवारी (19 डिसेंबरला) राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या अचानक वाढली. त्यामुळे 24 तासांत राज्यात 11 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे त्यामुळे आता राज्यात कोरोनाचे एकूण 35 सक्रिय रुग्ण आहेत ज्यामध्ये सर्वाधिक रुग्ण मुंबईमध्ये असल्याचे देखील समोर आला आहे. 24 तासांत यामध्ये लक्षणीय वाढ झाल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.
मुंबईत सर्वाधिक रूग्ण…
या आकडेवारीनुसार राज्यात आतापर्यंत 35 करण रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 27 रुग्ण फक्त एकट्या मुंबईत सापडले आहेत. तर पुण्यात दोन आणि कोल्हापूरमध्ये एक सक्रिय रुग्ण आढळला आहे. त्याचबरोबर यामधील 23 रुग्ण रुग्णांची प्रकृती गंभीर नसल्याने त्यांना होमे आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलेला आहे मात्र एक रुग्णाला रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे एकाही कोरोना रुग्णांचा मृत्यू झालेला नाही.
वृद्धांसाठी आनंदाची बातमी! अतिवृद्धांची पेन्शन वाढणार; राज्यसरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
दरम्यान दुसरीकडे देशात आठ डिसेंबरला केरळमध्ये कोरोनाच्या सब व्हेरिऐंटचा एक रूग्ण आढळून आला आहे. त्या अगोदर तामिळनाडूमध्ये देखील असाच एक रूग्ण आढळून आला होता. त्यामुळे केंद्र सरकार अलर्ट मोडवर आलं आहे. याबद्दल केंद्रीय आरोग्य सचिव सुधांश पंत यांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे.
RSS : जातनिहाय जनगणना करण्यास संघाचा विरोध? गाडगे म्हणाले, जात विस्मरणात जाऊ द्या…
त्यामध्ये नमूद केलं आहे की, केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील सातत्यपूर्ण आणि कामामुळे आणि कोरोना प्रकरणाची आकडेवारी नियंत्रित करू शकलो. मात्र कोरोनाचा उद्रेक अद्यापही सुरूच आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याच्या आव्हानांना प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी तयार राहण्यास सांगितले आहे.