Download App

“मध्य प्रदेशात EVM घोटाळा, त्याच मशीनवर महाराष्ट्रात निवडणुका”, राऊतांचा गंभीर आरोप

ज्या ठिकाणी सर्वात मोठा ईव्हीएम घोटाळा झाला असा खळबळजनक दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

Sanjay Raut on Election Commission : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut on Election Commission) आता निवडणूक आयोगाला टार्गेट केलं आहे. निवडणूक आयोग हा त्यांचा गुलाम आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत ईव्हीएम यंत्रांचा वापर होईल. पण व्हीव्हीपॅट मशीन (EVM Machine) लावणार नाही. म्हणजे कुणाला मत दिलं हे देखील कळणार नाही. मग निवडणुका घेताच कशाला असा सवाल राऊत यांनी विचारला. ईव्हीएम कुठून आणणार तर मध्य प्रदेशातून. ज्या ठिकाणी सर्वात मोठा ईव्हीएम घोटाळा झाला असा खळबळजनक दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

ज्या मध्य प्रदेशात सर्वात मोठा ईव्हीएम घोटाळा झाला. त्या ईव्हीएम महाराष्ट्रात आणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचं आयोगाने ठरवलं आहे, असे राऊत म्हणाले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा दिल्लीला गेले आहेत. आज दुपारी शिंदे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM) यांचीही भेट घेतील अशी चर्चा सुरू झाल्या आहेत. या भेटीवर राऊतांनी खोचक टीका केली.

शरद पवारांना पुन्हा धक्का! ‘या’ माजी आमदाराच्या हाती घड्याळ; पदाधिकाऱ्यांचंही इनकमिंग

राज्याच्या राजकारणात मोठं घडण्याइतकी मोठी माणसं सरकारमध्ये नाहीत. सरकारमधील आताची माणसं म्हणजे धरुन बांधून निर्माण केलेले पदाधिकारी आहेत. राज्याला महान माणसं देण्याची परंपरा सत्तेत होती पण भाजपमुळे खंडीत झाली. राहुल गांधी वारंवार (Rahul Gandhi) सांगतात कोई बडा खेला होनेवाला है, ते महाराष्ट्रात नाही, दिल्लीत होणार आहे असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

अमित शाह आणि त्यांच्या पक्षाचे मार्गदर्शक नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) दिल्लीत बसल्यामुळे राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना खासकरुन शिंदेसेनेला त्यांच्या प्रमुखांना येथेच येऊन बसावं लागेल. त्यात नवीन काय. त्यांच्या पक्षाचं मुख्यालय दिल्लीत आहे. म्हणून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) जर दिल्लीत आले असतील तर तो उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याशी योगायोग समजू नये असे राऊत यांनी सांगितले.

नियुक्ती मागे घ्या, न्यायालयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित राहिल; आरती साठेंच्या नियुक्तीवरून रोहित पवार आक्रमक

 

follow us