शरद पवारांना पुन्हा धक्का! ‘या’ माजी आमदाराच्या हाती घड्याळ; पदाधिकाऱ्यांचंही इनकमिंग

Maharashtra Politics : राज्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे (Maharashtra Local Body Elections) पडघम वाजू लागले आहेत. महायुतीकडून निवडणुकीची जोरदार तयारी केली जात आहे. जो येईल त्याला पक्षात प्रवेश दिला जात आहे. तर दुसरीकडे नेते आणि कार्यकर्त्यांना पक्ष ठेवण्याचे मोठे आव्हान महाविकास आघाडीसमोर (MVA) ठाकले आहे. कितीही प्रयत्न केले जात असली तर गळती थांबलेली नाही. आताही शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार राहुल मोटे यांनी (Rahul Mote) अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
राहुल मोटे भूम परांडा या मतदारसंघाचे आमदार राहिले आहेत. आता त्यांनी शरद पवारांची साथ सोडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. मोटे यांच्या व्यतिरिक्त धाराशिव, अहिल्यानगर आणि अकोला जिल्ह्यातील अनेक पदाधिकारीही राष्ट्रवादीत सामील झाले आहेत. अजित पवार यांनी या सर्व नेते आणि पदाधिकाऱ्यांचे पक्षात स्वागत केले.
धक्कादायक! बार्शीत शरद पवार गटाच्या तालुकाध्यक्षाची गाडी जाळली; रोहित पवारांच्या निशाण्यावर कोण?
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ही मोठी घडामोड आहे. या पक्षप्रवेशामुळेे अजित पवार गटाची ताकद वाढत आहे. राहुल मोटे यांच्या आधीही अनेकांनी पक्षात प्रवेश केला आहे. ग्रामीण भागातील कार्यकर्ते आणि माजी आमदारांचा यात समावेश आहे. आगामी जिल्हा परिषद, नगरपालिकांच्या निवडणुकीत अजित पवार गटाला याचा फायदा मिळणार आहे.
दुसरीकडे शरद पवार गटाला मात्र हा मोठा धक्का आहे. निवडणुका तोंडावर आलेल्या असताना असे एक एक करून लोक पक्ष सोडून जात असतील तर ही बाब निश्चितच चिंताजनक आहे. फक्त शरद पवारांचाच पक्ष नाही तर ठाकरे गट आणि काँग्रेसलाही या राजकारणाला तोंड द्यावं लागत आहे. या तिन्ही पक्षांचे नेते महायुतीवर टीका करण्यात व्यस्त आहेत. टीका करण्याची एकही संधी या पक्षांकडून सोडली जात नाही. मात्र दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकामागोमाग पक्ष सोडत आहेत. त्यांना कसे थांबवायचे, याकडे मात्र या पक्षांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.
धनंजय बिजले लिखित महामुद्राचे नितीन गडकरी, शरद पवारांच्या हस्ते प्रकाशन