Download App

धावत्या एसी बसमध्ये जोडप्याचे शरीरसंबंध; व्हिडिओ व्हायरल होताच कंडक्टरला धरले जबाबदार

conductor faces action: सार्वजनिक वाहनात अश्लिल चाळे करणे हा गुन्हा आहे. या प्रकरणी बस कंडक्टरला जबाबदार धरले आहे.

  • Written By: Last Updated:

couple Caught on cam having sex in bus, conductor faces action: दिल्लीतील मेट्रो, मुंबईतील लोकलमध्ये जोडप्यांचे अश्लिल चाळ्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल झालेले आहेत. नवी मुंबईत (Navi Mumbai)महानगरपालिकेच्या रिकाम्या धावत्या एसी बसमध्ये कपल शरीरसंबंध करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका वाहनचालकाने बावीस सेकंदांचा हा व्हिडिओ शूट केलाय. सार्वजनिक वाहनात अश्लिल चाळे करणे हा गुन्हा आहे. या प्रकरणी बस कंडक्टरला जबाबदार धरले आहे. त्याच्यावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याकडून मिळाली.

जनाधार असलेल्या नेत्यांची कॉंग्रेसला अ‍ॅलर्जी; थोपटेंच्या पक्षांतरावरून सत्यजित तांबेंनी सुनावले

हा प्रकार रविवारी सायंकाळी पनवेलहून कल्याणला जाणाऱ्या एसी बसमध्ये घडला आहे. 22 सेकंदांचा हा व्हिडिओ एका मोटारचालकाने शूट केला आहे. ज्याने वीस वर्षांच्या वयातील या जोडप्याला बसच्या खिडकीतून पाहिले. पनवेलहून कल्याणला जाताना बस बरीच रिकामी होती. जेव्हा जास्त वाहतुकीमुळे तिचा वेग कमी झाला. तेव्हा जोडप्याचा व्हिडिओ काढला आणि तो मुंबई महानगरपालिकेच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविला आहे. त्यानंतर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाने संबंधित कंडक्टरवर विभागीय कारवाई सुरू केली आहे.

बंगालचा सुपरस्टार करणार हिंदी मालिकेची निर्माती; स्टार प्लसवर ‘कभी नीम नीम कभी शहद शहद’ चा शुभारंभ!

बस कंडक्टरने पुरेशी सतर्कता दाखवली नाही. त्याने जोडप्याला असे करण्यापासून रोखणे गरजेचे गरजेचे होते. त्यामुळे कंडक्टरला जबाबदार धरून त्याला लेखी स्पष्टीकरण देण्यास सांगितले असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनरजीत चौहान यांनी दिली. परंतु याबाबत महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.


सार्वजनिक ठिकाण अश्लिल कृत्य हा गुन्हा

भारतीय न्याय संहितेच्या कलम 296 अंतर्गत, सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करणे हा गुन्हा आहे. या गुन्ह्यात तीन महिने तुरुंगवास किंवा एक हजार रुपये दंड होऊ शकतो. तसे तर गैरकृत्य करणाऱ्या जोडप्याविरुद्ध गुन्हा नोंदवणे गरजेचे होते. परंतु अद्याप हा गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही. परंतु कंडक्टरवर मात्र कारवाई सुरू झाली आहे.

follow us